
चालू घडामोडी 13, नोव्हेंबर 2024 | अंतराळ अभ्यास – 2024 | Exercise Antariksha Abhyas
![[ Space Exercise 'Antariksha Abhyas, Defence Space Agency, Antaral abhyas, sanrakshan, space technology, satellite for defence, vinyan ani tantradnyan notes, pahila antral abhyas, pahila antariksh abhyas, antariksh abhyas mahatvacha ka ahe, antral abhyas mahatvacha ka ahe, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Antariksha-Abhyas-2024_1731831342362.webp)
अंतराळ अभ्यास –2024
Exercise Antariksha Abhyas
Subject : GS - संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताचा पहिला 'अंतराळ अभ्यास - 2024' चे आयोजन कोठे करण्यात आले ?
1. नागपूर
2. मुंबई
3. नवी दिल्ली
4. हैद्राबाद
उत्तर : नवी दिल्ली
बातमी काय आहे ?
• अलीकडेच, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत डिफेन्स स्पेस एजन्सीने नवी दिल्ली येथे भारताचा पहिला 'अंतराळ अभ्यास' आयोजित करण्यात आला.
• ‘अंतराळ अभ्यास – 2024’ हा तीन दिवसीय सराव, 11 ते 13 नोव्हेंबर 24 या कालावधीत पार पडला.
• संरक्षण अंतराळ संस्थेतर्फे ( Defence Space Agency ) या सरावाचे आयोजन करण्यात आले.
भारतासाठी अंतराळ अभ्यास (अंतरीक्ष अभ्यास) महत्त्वाचा का आहे ?
• लष्करी ऑपरेशनमध्ये अंतराळ क्षमतेचे वापर वाढवणे.
• अंतराळात भारताची संरक्षण क्षमता मजबूत करणे आणि राष्ट्रीय धोरणात्मक उद्दिष्टे सुरक्षित करणे.
• अंतराळ युद्धाच्या क्षेत्रात भारतीय सशस्त्र दलांच एकत्रित तयारीला बळ देण्याच्या उद्देशाने हा अभ्यास एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
• हा अग्रगण्य कार्यक्रम भारताच्या अंतराळ आधारित कार्यक्षमतांना बळकट करण्यासाठी तसेच अंतराळ सुरक्षेसाठी तिन्ही सेवांचे एकत्रीकरण वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले
अंतराळ अभ्यास 2024 मध्ये कोणत्या घटकांचा विचार करण्यात आला ?
• सरावाच्या/ अभ्यासाच्या प्रमुख घटकांमध्ये उदयोन्मुख अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमांवर केंद्रित चर्चा करण्यात आली.
• या चर्चेत महत्त्वपूर्ण अंतराळ विषयक महत्वाच्या बाबींचे निरीक्षण आणि संरक्षणासह वाढत्या स्पर्धात्मक अंतराळाच्या क्षेत्रात परिस्थितीजन्य जागरूकता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
अंतराळतील तंत्रज्ञानाचा भारतीय संरक्षणासाठी वापर कसा करता येईल ?
• सशस्त्र दल सीमेवरील घुसखोरी, तोफखान्याच्या हालचाली आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण शोधण्यासाठी अंतराळतील तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
• मार्च 2019 मध्ये, भारताने मिशन शक्ती अंतर्गत शत्रूचे उपग्रह नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेल्या अँटी-सॅटलाइट टेस्टची (Anti-Satellite Test) यशस्वी चाचणी केली.
![[ Mission Shakti, Anti Satellite Missile, March 2019, Shatruche Upgrah nashta karnyasathi, antralatil tantragyancha bhartiya sankrakshanasathi kassa karta yeil ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Antariksha-Abhyas-Mission-Shakti-2019-Anti-Satellite_1731829178081.webp)