
चालू घडामोडी 09, नोव्हेंबर 2024 | प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना
![[ PM-Vidyalaxmi Scheme, PM-Vidyalaxmi yojna, pantapradhan Vidyalaxmi yojna, Pradhanmantri Vidyalaxmi yojna Kay ahe, government Scheme for higher studies, loan for students, educational loan, loan subsidy, E-voucher, Central Bank Digital Currency wallets. Vidyarthyansathi Sarkari yojna, shaikshanik karj, shikshanasathi loan kase kadhave, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/PM_Vidyalakshi_Scheme_1731471525370.webp)
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना
PM-Vidyalaxmi Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेला नुकतीच मंजुरी देण्यात आली. योजनेबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
अ) या योजनेअंतर्गत मुलींना मोफत पुस्तके दिली जाणार आहे.
ब) प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना हा राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
पर्याय
1. फक्त अ योग्य आहे.
2. फक्त ब योग्य आहे.
3. अ आणि ब दोन्ही योग्य आहे
4. अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे.
उत्तर : फक्त ब योग्य आहे.
• ही योजना उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देते.
• म्हणून पर्याय अ चुकीचा आहे.
बातमी काय आहे ?
केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षणासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे.
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना काय आहे ?
• प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना हा राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
• गुणवंत विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी तारण विरहित (Collateral-Free Loans), हमीदार विरहित कर्ज (Guarantor-Free Loans) उपलब्ध करून देते.
• 2024-25 ते 2030-31 या कालावधीत 3,600 कोटी रुपये या योजनेअंतर्गत खर्च करण्यात येणार आहे.
•
कोणत्या विद्यार्थ्यांना कर्ज मिळू शकेल ? किती ?
• नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे पहिल्या 100 मध्ये रँक केलेल्या संस्थांमध्ये आणि राज्य सरकार आणि सर्व केंद्र सरकार शासित संस्थांमधून 101-200 रँक असलेल्या संस्थांमध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी योजनेसाठी पात्र असतील.
• 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, विद्यार्थी त्याच्या थकबाकीच्या 75% कर्जहमीसाठी पात्र असेल.
• 8 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्याज सवलत योजनेसाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कर्ज परतफेडीच्या काळात 3 टक्के व्याज सवलत देखील दिली जाईल.
कर्ज मिळविण्यासाठी अर्ज कोठे करावा ?
• उच्च शिक्षण विभागाकडे “PM-Vidyalaxmi” एक एकीकृत पोर्टल असेल ज्यावर सर्व बँकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या सोप्या अर्ज प्रक्रियेद्वारे विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी तसेच व्याज सवलतीसाठी अर्ज करू शकतील.
• व्याज सवलतीचे पेमेंट ई-व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वॉलेटद्वारे केले जाईल.