
चालू घडामोडी 08, नोव्हेंबर 2024 | राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस | National Cancer Awareness Day
![[ World Cancer Day, National Cancer Awareness Day, karkrog, rashtriya karkrog jagrukta divas, karkrog kasa hoto, karkrogavar upchar, karkrogachi karane, Cancer kasa hoto, Cancer treatment, Cancer upay, Cancer hospital, vinyan ani tantradnyan notes marathi madhe, science notes, Rog ani ajar, WHO, World health organisation, jagtik arogya sanghatna, Cancer patients, Cancer bara kasa hoto, Chemotherapy, radiotherapy, treatment, surgery, radiation, oncology, Improving access to cancer prevention, early detection and treatment, National Cancer Awareness Day theme, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/National_Cancer_Awarness_Day_1731249805149.webp)
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस
National Cancer Awareness Day
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 2 फेब्रुवारी
2. 8 मार्च
3. 7 नोव्हेंबर
4. 1 डिसेंबर
उत्तर : 7 नोव्हेंबर
कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो.
(नोट : जागतिक कर्करोग दिवस हा 4 फेब्रुवारी या दिवशी असतो.)
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरी का करण्यात येतो ?
• कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात.
• कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.
• जगभरात, 6 पैकी 1 मृत्यू कर्करोगामुळे होतो.
• कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि उपचारांबद्दल लोकांमध्ये जागरूक निर्माण करण्यासाठी
• लोकांना वेळेवर तपासणी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी
• कर्करोगाची भीती कमी करण्यासाठी
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस ७ नोव्हेंबर ला का साजरी करतात ?
• ७ नोव्हेंबर या दिवशी नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांचा वाढदिवस असतो.
• मादाम क्युरी (Madame Curie) यांनी कॅन्सरशी लढण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
• त्यांच्या या योगदानाच्या स्मरणार्थ ७ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
कर्करोग (कॅन्सर) म्हणजे काय ?
What is Cancer ?
• जागतिक आरोग्य संघटने नुसार, कर्करोग हा रोगांचा एक मोठा समूह आहे, जो शरीराच्या जवळजवळ कोणत्याही अवयव किंवा ऊतींमध्ये सुरू होऊ शकतो.
• यामध्ये, पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि सामान्य मर्यादेपलीकडे जातात आणि शरीराच्या आसपासच्या भागांवर आक्रमण करतात.
कर्करोगाची (कॅन्सर ची) प्रमुख लक्षणे कोणती ?
• वेगाने वजन कमी होणे
• सातत्याने येणारा खोकला
• रक्तस्त्राव
• रक्ताच्या गाठी येणे
• कायम थकवा जाणवने
• पोटात दुखणे इत्यादी.
![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
भारतातील कर्करोगाचे सर्वात सामान्य प्रकार कोणते ?
• स्तनाचा कर्करोग
• तोंडाचा कर्करोग
• फुफ्फुसाचा कर्करोग
• घशाचा कर्करोग इत्यादी.
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)
कर्करोगाचा उपचार कसा शक्य आहे ?
• कर्करोग व्यक्तीच्या शरीरात किती पसरला आहे आणि तो कोणत्या टप्प्यावर आहे, कर्करोगाचा विकार कोणता यावर कर्करोगाचा उपचार अवलंबून असतो.
• रसायनोपचार (Chemotherapy), इम्युनोथेरपी, किरणोत्सर्गी उपचार (Radiotherapy), शल्य चिकित्सा (Surgery) इत्यादी उपचाराचे पर्याय कर्करोगाच्या उपचारात वापरले जातात.
• कर्करोगावरील उपचार पद्धती ही रुग्णाच्या आरोग्यावरही अवलंबून असते.
• कर्करोगाचे सुरुवातीलाच निदान केले तर तो सहज बरा होऊ शकतो.
कर्करोगाची कारणे कोणती ?
• तंबाखू सेवन : तंबाखूचे सेवन, धूम्रपान हे भारतातील कर्करोगासाठी जबाबदार सर्वात मोठे कारण आहे.
• सरकारी आकडेवारी नुसार, पुरुषांमध्ये अंदाजे 40 ते 50 टक्के आणि महिलांमध्ये 20 टक्के कर्करोग हा तंबाखूमुळे होतो.
• अल्कोहोल
• आवश्यक पोषण आहाराची कमतरता
• निष्क्रिय राहणीमान
• किरणोत्सर्गी संपर्क - आयनीभवन करू शकणाऱ्या विकिरणामुळे उदाहरणार्थ, क्ष किरणांच्या समवेत सतत काम करणे,
• विषारी रसायनांच्या संपर्कात काम करणे.
कर्करोग प्रतिबंधात्मक (टाळण्यासाठीचे) उपाय कोणते ?
• सकस आहार घेणे
• नियमित व्यायाम करणे
• तंबाखू-दारू टाळावे
• वेळोवेळी नियमित तपासणी करणे ; इत्यादी
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारांच्या संधीमध्ये उपलब्धता वाढवणे.