
चालू घडामोडी 06, नोव्हेंबर 2024 | पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद | First Asian Buddhist Summit
![[ First Asian Buddhist Summit, pahili ashiyai shikhar Parishad, International Buddhist Confederation, art and culture, Kala Ani sanskruti notes Marathi madhe, Role of Buddha Dhamma in Strengthening Asia, Ministry of Culture, sanskrutik mantralay, Rashtrapati Droupadi murmu, pramukh pahune, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/ASIAN_Buddist_Summit_1731147169684.webp)
पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद
First Asian Buddhist Summit
Subject : GS - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?
1. नागपूर
2. मुंबई
3. नवी दिल्ली
4. अमरावती
उत्तर : नवी दिल्ली
बातमी काय आहे ?
• पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद, 5-6 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली, येथे पार पडली.
• केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (International Buddhist Confederation) च्या सहकार्याने पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.
• या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होत्या.
पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषदेची मुख्य संकल्पना (थीम) काय आहे ?
‘आशिया खंडाच्या बळकटीकरणात बुद्ध धम्माची भूमिका’ ही या शिखर परिषदेची मुख्य संकल्पना आहे.
“Role of Buddha Dhamma in Strengthening Asia”
पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषदेचे उद्दिष्ट काय आहे ?
संपूर्ण आशियातील बौद्ध समुदायामध्ये संवाद वाढवणे, समजूतदारपणा वाढवणे आणि समकालीन आव्हानांना संबोधित करणे या उद्देशाने हा एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मेळावा आहे.
पहिल्या आशियाई बौद्ध शिखर परिषदेत कोण- कोणत्या विषयांचा समावेश होता ?
- बौद्ध कला, वास्तुकला आणि वारसा.
- बौद्ध कारिका आणि बौद्ध धम्माचा प्रसार.
- पवित्र बौद्ध अवशेषांची भूमिका आणि समाजातील त्याची प्रासंगिकता.
- वैज्ञानिक संशोधन आणि कल्याणामध्ये बौद्ध धम्माचे महत्त्व.
- 21 व्या शतकात बौद्ध साहित्य आणि तत्वज्ञानाची भूमिका.
वरील विषयांतील चर्चेबरोबरच, 'आशियाला जोडणारा धम्म सेतू (पूल) - भारत' या संकल्पनेवर आधारित एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (International Buddhist Confederation) काय आहे ? ती काय काम करते ?
आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ ही नवी दिल्ली स्थित एक बौद्ध संस्था आहे जी जगभरातील बौद्धांसाठी एक समान व्यासपीठ म्हणून काम करते.