
चालू घडामोडी 05, नोव्हेंबर 2024 | भारताची पहिली ॲनालॉग अंतराळ मोहिम
![[ Bhartachi Pahili Analog Antral Mohim, India’s first Analog Space Mission, Ladakh, 1 November 2024, Gaganyaan Mission, Analog Antral Mission mhanje nemke kay, Analog Space Missionche Udisthe kay ahe, Analog Space Missioncha kay fayda hoiel, Analog Space MIssionsathi Ladakhchich nivad ka keli geli, bhaugolik paristithi, India’s first Analog Space Mission, ISRO, scientists, rocket, NASA mission, ISRO mission, spaceX mission, space technology, antaralveer, antaral sanshodhan, satellite, upagrah, missile, gaganyan missing, MPSC vinyan ani tantradnyan notes, Leh Ladakh, chandra, Mangal, moon, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Analog_Mission_1731145506589.webp)
भारताची पहिली ॲनालॉग अंतराळ मोहिम
India’s first Analog Space Mission
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताची पहिली ॲनालॉग अंतराळ मोहिम नुकतीच लाँच करण्यात आली. त्याबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
अ) ही मोहीम लेह या ठिकाणी लाँच करण्यात आली.
ब) अंतराळवीरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे.
क) गगनयान आणि इतर भविष्यातील अंतराळ मोहिमांना यामुळे फायदा होईल.
पर्याय :
1. फक्त अ आणि ब बरोबर
2. फक्त अ आणि क बरोबर
3. फक्त ब आणि क बरोबर
4. अ, ब आणि क बरोबर
उत्तर : अ, ब आणि क बरोबर
बातमी काय आहे ?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 1 नोव्हेंबर 2024 रोजी लेह,(लडाख) येथे देशातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन लाँच केले.
ॲनालॉग अंतराळ मोहिम म्हणजे नेमकं काय ?
• ॲनालॉग अंतराळ मोहिम म्हणजे पृथ्वीवरील अशा ठिकाणी आयोजित केलेल्या चाचण्या ज्या भौतिकदृष्ट्या अत्यंत अंतराळातील वातावरणाशी मिळतात.
• चंद्र, मंगळ किंवा लघुग्रह यांसारख्या स्थानांवरील मोहिमेवर अंतराळवीरांना ज्या जीवन परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याची प्रतिकृती येथे बनवलेली आहे.
• या ॲनालॉग मिशनमध्ये, प्रतिकूल परिस्थितीत, धोकादायक हवामानात आणि इतर ग्रहांवर मानवी वर्तन कसं बदलतं, हे देखील या मोहिमेत पाहिलं जाईल.
• त्याचप्रमाणे येथिल वातावरणात काही चाचण्या घेतल्या जातील.
• उदाहरणार्थ नवीन तंत्रज्ञान, रोबोटिक उपकरणं, रोबोटिक वाहनं, अधिवास, दळणवळण, वीजनिर्मिती, गतिशीलता, पायाभूत सुविधा आणि साठवण यांची चाचणी घेतली जाईल.
ॲनालॉग अंतराळ मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे ?
अवकाशासारख्या एकाकी आणि बंदिस्त वातावरणात अंतराळवीरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे.
ॲनालॉग अंतराळ मोहिमेचा काय फायदा होईल ?
• गगनयान आणि इतर भविष्यातील अंतराळ मोहिमांना मानवी वर्तनाबद्दल आवश्यक अशी महत्त्वपूर्ण माहिती याद्वारे मिळेल.
• भविष्यातील खोल-अंतराळ मोहिमांच्या नियोजन करण्यास मदत होईल.
• हे संशोधन अंतराळातील आव्हानात्मक परिस्थितीत क्रू सुरक्षा (अंतराळवीरांची सुरक्षा), कार्यक्षमता आणि मोहिमेचे यश सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
ॲनालॉग स्पेस मिशनसाठी लडाखचीच निवड का केली गेली ?
• लडाखची येथिल थंड, कोरडे हवामान, नापीक जमीन आणि उंची अशा सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणाची निवड करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
• लडाखची भौगोलिक परिस्थिती चंद्र आणि मंगळ या दोन्हींप्रमाणे आहे.
• चंद्र आणि लडाख या दोन्ही ठिकाणी अत्यंत कोरडे वातावरण आहे.
• लडाखमध्ये चंद्र आणि मंगळ या दोन्हींप्रमाणेच तापमानात लक्षणीय चढ-उतार होतात.
• लडाखचा खडकाळ, नापीक भूभाग चंद्र आणि मंगळाच्या भूभागासारखा आहे.