
चालू घडामोडी 01, नोव्हेंबर 2024 | किल्ले रायगड | Raigad Fort
![[ RAIGAD FORT, Raigad Killa, Chhatrapati shivrayancha rajyabhishek sohla, raigadache June nav, Gibraltar of the East, purvekadil Gibraltar, maratha samrajya, maratha shasak, Raigad zilha, swarajachi rajdhani, dinvishesh, maharashtratil gad, maharashtratil kille, maharashtratil gad- Killa, marathyancha Etihas, peshwe, maratha Raje, maratha samrajya, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Raigad_Killa_1730625305119.webp)
किल्ले रायगड | Raigad Fort
बातमी काय आहे ?
• गुजरातच्या केवड्यातील राष्ट्रीय एकता दिवस परेडच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, शौर्यकर्म आणि नवनवीन युद्ध तंत्राचे दर्शन घडविण्यासाठी रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
• राष्ट्रीय एकता दिवस 2024 ची संकल्पना (थीम), "दुर्गदुर्गेश्वर रायगड" अशी आहे.
Subject : GS - इतिहास- मराठा साम्राज्य
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पूर्वेकडील जिब्राल्टर असे खालील पैकी कोणत्या किल्ल्यास म्हटले जाते ?
1. साल्हेर किल्ला
2. रायगड किल्ला
3. शिवनेरी किल्ला
4. प्रतापगड किल्ला
उत्तर : रायगड किल्ला
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाबद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• रायगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे.
• हा महाड येथे वसलेला डोंगरी किल्ला आहे.
• हा किल्ला त्याच्या पायथ्यापासून 820 मीटर उंचीवर आणि सह्याद्री पर्वत रांगेत समुद्रसपाटीपासून 1,356 मीटर उंचीवर आहे.
• रायगड किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.
• प्राचीन नाव : रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते.
• युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ (Gibraltar of the East) असे म्हणत असत. जिब्राल्टर ठिकाण जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम किल्ला म्हणून रायगडास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हटले जाते.
• रायरी किल्ला पूर्वी आदिलशाहीच्या चंद्रराव मोरे यांच्याकडे होता.
• १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांकडून तो जिंकून घेतला.
• स्वराज्याची राजधानी : शत्रूला जिंकण्यासाठी अवघड, सागरी दळणवळणासही सोईस्कर, असे रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात छत्रपती शिवरायांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी बनविली.
• शिवराज्याभिषेक : छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
“भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये” (Maratha military landscape) UNESCO नामांकन नेमकं काय आहे ?
• भारत 2024-25 या वर्षासाठी "मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया" अर्थात "भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये" यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी अधिकृतपणे नामांकन केले आहे.
• “भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये” या शीर्षकाखाली 12 किल्ले आहेत ज्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसाठी नामांकन मिळाले आहे.
• या नामांकनामध्ये महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला, अशा 12 किल्ल्यांचा समावेश आहे.
• हे किल्ले १७ व्या ते १९ व्या शतकात विकसित झाले.
• सह्याद्रीच्या पर्वत रांगा, कोकण किनारा, दख्खनचे पठार आणि पूर्व घाट अशा विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये हे किल्ले बांधले गेले.
• "भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये", त्या काळातील मराठा शासकांच्या कल्पनेतून साकारलेली अभेद्य तटबंदी आणि मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा आहेत.