
चालू घडामोडी 30, ऑक्टोबर 2024 | राष्ट्रीय आयुर्वेद दिवस | National Ayurveda Day
![[ National Ayurveda Day, Diwali, dipavali, diwaliche mahatva, rashtriya Ayurveda din, rashtriya Ayurveda divas kevha sajri kela jato, ministry of Ayush, Ayush mantralay, panch mahabhute, bhagvan dhanwantari, Dhanawantari Jayanti, Dhanteras, ayurvedic medicine, ayurvedic treatment, ayurvedic hospitals, ayurved Kay ahe, ayurved mhanje Kay, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Ayurved_Din_1730346249691.webp)
राष्ट्रीय आयुर्वेद दिवस
National Ayurveda Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) यंदाचा राष्ट्रीय आयुर्वेद दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
1. 10 ऑक्टोबर
2. 24 ऑक्टोबर
3. 29 ऑक्टोबर
4. 2 नोव्हेंबर
उत्तर : 29 ऑक्टोबर
राष्ट्रीय आयुर्वेद दिना बद्दल महत्त्वाची माहिती :
• भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणजे दिवाळी चा धनतेरस हा दिवस “राष्ट्रीय आयुर्वेद दिन” म्हणून साजरी केला जातो.
• 2024 ची धनतेरस 29 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली.
• यंदाचा हा 9 वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन आहे.
• 150 हून अधिक देश यंदाच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनात सामील होणार आहेत
• आयुर्वेद ही पारंपारिक औषध प्रणाली आहे जीचा उगम प्राचीन भारतात झाला.
• आयुर्वेद हे सर्वांगीण विकासासाठी शरीर, मन आणि आत्म्यामध्ये संतुलन साधण्यावर लक्ष केंद्रित करते.
आयुर्वेद या शब्दाचा अर्थ काय ?
• आयुर्वेद हा "आयु" आणि "वेद" या दोन संस्कृत शब्दांपासून आला आहे.
• "आयु", म्हणजे जीवन आणि "वेद", म्हणजे ज्ञान.
• अशा प्रकारे, आयुर्वेद हा शब्द "जीवनाचे ज्ञान" दर्शवतो.
भारतात पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• 2016 मध्ये आयुष मंत्रालयाने (Ministry of Ayush) आयुर्वेद दिन साजरा करण्याची घोषणा केली.
• पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिन 2016 मध्ये साजरा केला तेव्हापासून दरवर्षी धन्वंतरी जयंती (धनतेरस) दिनाच्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय आयुर्वेद दिन का साजरी करण्यात येतो ?
राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट काय आहे?
आयुर्वेदिक तत्त्वे, औषधी वनस्पती आणि जीवनशैलीच्या पद्धतींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी.
राष्ट्रीय आयुर्वेद दिन धनतेरस दिनाच्या दिवशीच का साजरी करतात ?
• भारतात आयुर्वेदाच्या ज्ञानाचे श्रेय भगवान धन्वंतरी या देवांला दिले जाते.
• भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जन्मदाता म्हणून ओळखले जाते.
• धन्वंतरी हे देवतांचे वैद्य असून त्यांना हे ज्ञान भगवान ब्रह्मदेवाकडून मिळाले.
• आयुर्वेद दिन भगवान धन्वंतरीना समर्पित आहे.
• आरोग्य देवता धन्वंतरी हे समुद्रमंथनावेळी अमृत कलश घेऊन अवतरले अशी पौराणिक कथा आहे.
राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या लोगोमध्ये कोण कोणत्या घटकांचा समावेश आहे ?
• लोगोच्या मध्यभागी भगवान धन्वंतरी आहे.
• लोगोमधील 5 पाकळ्या पंच महाभूताचे प्रतीक आहेत.
• पाकळ्यांच्या खाली तीन वर्तुळे वात, पित्त, कफ, ही आयुर्वेदाची मूलभूत तत्त्वे दर्शवतात.
• घटकांना वेढलेले अंडाकृती पान या मूलभूत तत्त्वांवर आधारित निसर्गाद्वारे बरे करण्याचे सार (शक्ती) दर्शवते.
राष्ट्रीय आयुर्वेद दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
" जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवकल्पना " ही यंदाच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिन 2024 ची थीम आहे.
" Ayurveda Innovation for Global Health "