21 वी पशुधन गणना
21st Livestock Census
Subject : GS - अर्थशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पशुधन गणनेबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. देशातील पहिली पशुगणना 1919-1920 मध्ये करण्यात आली.
2. दर 10 वर्षांनी पशुधन गणना केली जाते.
3. डिजिटल पद्धतीने स्मार्टफोन/टॅब्लेटद्वारे आयोजित केली जाणारी यंदाची ही पहिली पशुधन गणना आहे.
4. वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहे.
उत्तर : देशातील पहिली पशुगणना 1919-1920 मध्ये करण्यात आली. हा पर्याय बरोबर आहे.
• दर 5 वर्षांनी पशुधन गणना केली जाते.
• डिजिटल पद्धतीने स्मार्टफोन/टॅब्लेटद्वारे आयोजित केली जाणारी यंदाची ही दुसरी पशुधन गणना आहे.
(2019 मध्ये पहिली डिजिटल पद्धतीनेगणना केली गेली होती.)
बातमी काय आहे ?
• अलीकडेच, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री यांनी नवी दिल्ली येथे 21 वी पशुधन गणना सुरू केली.
• केंद्र सरकारने देशातील पशु आरोग्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महामारी निधी प्रकल्प देखील सुरू केला आहे.
• 21 वी पशुगणना मोहीम ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान देशभरात राबविण्यात येणार आहे.
देशात पशुगणना कोण करते ?
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय संबंधित राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विभागाच्या भागीदारीत पशुधन गणना करतात.
देशात पहिली पशुधन गणना केव्हा करण्यात आली ?
• देशातील पहिली पशुगणना 1919-1920 मध्ये करण्यात आली.
• तेव्हापासून दर 5 वर्षांनी पशुधन गणना केली जाते.
पशुधन गणना किती वर्षांनी केली जाते ?
• दर 5 वर्षांनी पशुधन गणना केली जाते.
• आतापर्यंत 20 पशुधन गणना झाल्या आहेत. यंदाची ही 21 वी पशुधन गणना आहे.
• 20वी पशुधन गणना 2019 मध्ये देशभरात करण्यात आली.
21 व्या पशुधन गणनेबद्दल काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये :
• गणनेत देशातील पाळीव प्राणी, कुक्कुटपालन आणि भटक्या प्राण्यांची संख्या मोजली जाते.
• 21 व्या गणनेत 16 प्राणी प्रजातींची माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये: गाय, म्हैस, मिथुन, याक, मेंढ्या, शेळी, डुक्कर, उंट, घोडा, पोनी, खेचर, गाढव, कुत्रा, ससा आणि हत्ती यांचा समावेश होतो.
• नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस (NBAGR) द्वारे मान्यताप्राप्त या 16 प्रजातींच्या 219 देशी जातींची माहिती या गणनेत घेतली जाईल.
• या व्यतिरिक्त, कोंबडी, बदक, टर्की, शहामृग आणि इमू यांसारख्या कुक्कुट पक्ष्यांचीही गणना केली जाईल.
• ही दुसरी जनगणना आहे जी डिजिटल पद्धतीने स्मार्टफोन/टॅब्लेटद्वारे आयोजित केली जात आहे.
• यापूर्वी 2019 मधील जनगणना पूर्णपणे डिजिटल केली गेली होती.
• देशातील ही पहिली पशुगणना आहे ज्यामध्ये पशुपालक शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधनाची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध होईल.
पशुधन गणनेचा फायदा काय ?
• या जनगणनेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील 16 प्रजातींच्या पशुधनाची लोकसंख्या, जाती, लिंग, वय आणि वापर यांचा तपशील देण्यात येईल.
• यामुळे संपूर्ण भारतातील पशुधनाच्या लोकसंख्येची माहिती गोळा करण्यात मदत होईल.
• हा डेटा पशुधन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कार्यक्रमांचे योग्य नियोजन, सूत्रीकरण, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यात सरकारला मदत करेल.
• या गणनेमुळे सरकारला या क्षेत्राच्या विकासासाठी आणि पशु आरोग्य संरक्षणासाठी योग्य धोरणे आखण्यास मदत होईल.