
चालू घडामोडी 26, ऑक्टोबर 2024 | ड्राय पोर्ट म्हणजे काय ? | Dry Port ?

ड्राय पोर्ट म्हणजे काय ? | Dry Port
Subject : GS - भूगोल, अर्थशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. ड्राय पोर्ट हे जमिनीवरील बंदर म्हणून ओळखले जाते.
2. नुकतेच बिहार मधील पहिले ड्राय पोर्ट पटना जिल्हात उभारण्यात आले.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
बातमी काय आहे ?
• बिहारच्या उद्योगमंत्र्यांनी बिहारच्या पहिल्या ड्राय पोर्टचे उद्घाटन केले.
• हे ड्राय पोर्ट बिहार मधील पटना जिल्हातील बिहटा या ठिकाणी आहे.
• बिहटा ड्राय पोर्ट 7 एकरांवर पसरले आहे.
• हे प्रिस्टाइन मगध इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य उद्योग विभागाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी ( Public-Private Partnership model) मोडवर स्थापित केले आहे.
बिहटा ड्राय पोर्टमुळे बिहार ला कसा फायदा होईल ?
• बिहारसारख्या भूपरिवेष्टित राज्यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
• बिहारच्या दीर्घकालीन औद्योगिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच राज्याच्या लॉजिस्टिक क्षेत्राला स्थैर्य आणि बळ देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
• निर्यात वाढ : निर्यात वस्तू प्रामुख्याने कृषी-आधारित आहेत, कापड आणि चामड्याची उत्पादने वेगवेगळ्या ठिकाणी तयार केली जातात. पोर्टमुळे येथिल वस्तूंच्या निर्यातीमध्ये वाढ होईल.
• ड्राय पोर्टमुळे नवीन रोजगार निर्मिती होईल.
ड्राय पोर्ट म्हणजे काय ? त्याचे फायदे काय ?
• साधारणपणे पोर्ट /बंदर हे समुद्र किंवा पाण्याच्या जलाशयाजवळ आढळून येते.
• ड्राय पोर्ट हे जमिनीवरील बंदर म्हणून ओळखले जाते.
• ड्राय पोर्ट, ज्याला इनलँड कंटेनर डेपो (Inland Container Depots) असेही म्हणतात.
• मालाची आयात-निर्यात करण्यापूर्वी माल एकत्र आणण्यासाठीच्या आणि कंटेनरमधल्या मालाची अल्प काळासाठी साठवणूक करण्यासाठी इनलँड कंटेनर डेपोचा प्रामुख्याने वापर होतो.
• ड्राय पोर्ट अंतर्देशीय प्रदेशांना बंदरे आणि विमानतळांशी जोडतात, ज्यामुळे मालाची कार्यक्षम वाहतूक सुलभ होते.
• लॉजिस्टिक्स सुव्यवस्थित करण्यात ड्राय पोर्ट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
• ड्राय पोर्टचा सर्वोत्कृष्ट भाग म्हणजे तो कस्टम क्लिअरन्स प्रक्रिया हाताळतो, ज्यामुळे बंदरे/विमानतळावरील गर्दी कमी होते.
• ड्रायपोर्टमुळे उद्योगांना कमी वेळेत कच्चा माल उपलब्ध करता येऊ शकतो.
• इंधन व वेळेची मोठी बचत होते त्यामुळे वाहतूक खर्च कमी होतो.
• रोजगार निर्मिती होते.
भारतातील ड्राय पोर्ट्स कोण चालवतात ?
भारतातील ड्राय पोर्ट्स सरकारी एजन्सी आणि खाजगी कंपन्या चालवतात.
भारतातील पहिले ड्राय पोर्ट कोणते ?
• भारतातील पहिले ड्राय पोर्ट 2018 मध्ये वाराणसी येथे उघडण्यात आले.
• भारतात 330 हून अधिक ड्राय पोर्ट कार्यरत आहेत.