
चालू घडामोडी 25, ऑक्टोबर 2024 | राष्ट्रीय महिला आयोग | National Commission for Women

राष्ट्रीय महिला आयोग
National Commission for Women
Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1. विजया किशोर रहाटकर
2. जयंती पटनायक
3. अर्चना मजुमदार
4. रुपाली चाकणकर
उत्तर : विजया किशोर रहाटकर
बातमी काय आहे ?
• श्रीमती. विजया किशोर रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्षा असतील.
(नोट : रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.)
राष्ट्रीय महिला आयोगा बद्दल Most Important वनलाईनर पॉईंट्स :
• राष्ट्रीय महिला आयोग ही एक स्वायत्त आणि वैधानिक संस्था (Autonomous & Statutory Body) आहे.
• स्थापना : 31 जानेवारी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.
• राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990 अंतर्गत या आयोगाची स्थापन करण्यात आली आहे.
• राष्ट्रीय महिला आयोग सल्लागार संस्था आहे.
• या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत आणि ते प्रकरणांची चौकशी करू शकतात आणि विभागांकडून अहवाल मागवू शकतात. हा आयोग कोणत्याही व्यक्ती किंवा अधिकाऱ्याला समन्सही जारी करू शकतात.
राष्ट्रीय महिला आयोगाची मुख्य कार्य कोणती ?
• महिलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारी प्रकरणे हाताळणे.
• महिलांच्या सुरक्षेसाठी घटनात्मक आणि कायदेशीर चौकटीचे पुनरावलोकन करणे.
• महिला सुरक्षेच्या मुद्द्यांची तपासणी करणे
• तक्रार निवारणाची सोय करणे
• केंद्र सरकारला अहवाल सादर करणे
• महिलांशी संबंधित धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या ?
• जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.
• पहिला आयोग 31 जानेवारी 1992 रोजी स्थापन करण्यात आला.