
चालू घडामोडी 24, ऑक्टोबर 2024 | 16 वी ब्रिक्स शिखर परिषद | 16th BRICS Summit 2024

16 वी ब्रिक्स शिखर परिषद
16th BRICS Summit 2024
Subject : GS - शिखर परिषद
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 16 वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे पार पडली ?
1. भारत
2. चीन
3. रशिया
4. ब्राझील
उत्तर : रशिया
बातम्यांमध्ये :
• 16 वी ब्रिक्स शिखर परिषद रशियाने आयोजित केली.
• ही शिखर परिषद रशियातील कझान येथे पार पडली.
कझान घोषणापत्र (Kazan Declaration)म्हणजे काय ?
• या शिखर परिषदेत कझान घोषणापत्र (Kazan Declaration) जारी करण्यात आले.
• कझान घोषणापत्र हा एक सर्वसमावेशक दस्तऐवज आहे जो सहभागी देशांमधील वर्धित सहकार्याच्या गरजेवर भर देतो आणि महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर ब्रिक्स संघटनेची एकत्रित भूमिका मांडतो.
• कझान घोषणेमध्ये "जागतिक विकास आणि सुरक्षिततेसाठी बहुपक्षीयता मजबूत करणे" यावर जोर देण्यात आला आहे.
• यासाठी शांतता प्रस्थापित करणे, एक न्याय्य आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था सुनिश्चित करणे आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनही दिले.
ब्रिक्स म्हणजे काय ?
What is BRICS ?
• BRICS - Brazil, Russia, India, China, and South Africa
• ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या समूहाचा संदर्भ देणारा हा शब्द वापरला जातो.
• ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जिम ओ' नील यांनी 2001 मध्ये प्रथमच 'BRIC' हे संक्षिप्त रूप तयार केले.
• 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन या देशातील परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत BRIC या गटाला औपचारिकता देण्यात आली होती.
• 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 5 वा देश म्हणून या गटात समावेश झाला आणि BRIC चे नाव बदलून BRICS - (Brazil, Russia, India, China, and South Africa) असे करण्यात आले.
BRICS चा विस्तार :
2023 मध्ये, दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, इराण, संयुक्त अरब अमिराती(United Arab Emirates), सौदी अरेबिया, अर्जेंटिना, इजिप्त आणि इथिओपिया या सहा देशांना युतीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
न्यू डेव्हलपमेंट बँक (New Development Bank) कोणत्या संघटनेने स्थापन केली ?
• 2014 मध्ये BRICS संघटनेने न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) ची स्थापना केली.या बँकचे भांडवल $100 अब्ज आहे.
• BRICS आणि इतर विकसनशील राष्ट्रांमध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी न्यू डेव्हलपमेंट बँक निधी (Funding) पुरवते.
🧐ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित आहे का ?
21 वी आसियान-भारत शिखर परिषद कोठे पार पडली ?
आसियान म्हणजे काय ?
आसियान संघटने मध्ये किती देश आहे ? आणि कोणते ?
✍️उत्तरे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇
चालू घडामोडी 12, ऑक्टोबर 2024