जागतिक भूक निर्देशांक 2024
Global Hunger Index (GHI) 2024
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांक 2024 (Global Hunger Index) मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?
1. 50
2. 99
3. 105
4. 125
उत्तर : 105
बातमी काय आहे ?
• नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांक (GHI) 2024 च्या यादीत 127 देशांमध्ये भारत 105 व्या क्रमांकावर आहे.
• 2024 च्या या निर्देशांकात नेपाळ 68 व्या, श्रीलंका 56 व्या, बांगलादेश 84 व्या भारत 105 आणि पाकिस्तानचा क्रमांक 109 आहे.
• चीन, UAE आणि कुवेतसह 22 देश या निर्देशांकात प्रथम क्रमांकावर आहेत.
• याचा अर्थ असा होतो की, चीन, बांगलादेश, नेपाळ व श्रीलंका यांच्यापेक्षाही आपली स्थिती खालावलेली असल्याचे निर्देशांकातून दिसून येते.
‘जागतिक भूक निर्देशांक’ म्हणजे काय ?
What is the Global Hunger Index ?
• जागतिक भूक निर्देशांक' नावाचा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो.
• Global Hunger Index म्हणजेच जागतिक भूक निर्देशांक, या अहवालाच्या माध्यमातून जागतिक, क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर उपासमारीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाते व त्यातून दरवर्षी जागतिक भूक निर्देशांक जाहीर केला जातो.
जागतिक भूक निर्देशांक हा अहवाल कोण तयार करतात ?
जर्मनीची 'वेल्ट हंगर हिल्फे' (Welthungerhilfe) आणि आयर्लंडची NGO 'कन्सर्न वर्ल्डवाइड' (Concern Worldwide) या युरोपातील दोन एजन्सीमार्फत जागतिक भूक निर्देशांक हा अहवाल तयार केला जातो.
जागतिक भूक निर्देशांक तयार का केला जातो ? जागतिक भूक निर्देशांक तयार करण्याचा उद्देश काय आहे ?
• भुकेविरुद्धच्या संघर्षाबद्दल जागरूकता आणि समज वाढवण्यासाठी
• देश आणि प्रदेशांमधील उपासमारीच्या पातळीची तुलना करण्याचा मार्ग प्रदान करण्यासाठी
• जिथे उपासमारीची पातळी सर्वात जास्त आहे आणि जिथे भूक दूर करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची तसेच तातडीची आवश्यकता आहे. अशा भागांकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी.
जागतिक भूक निर्देशांक यादी तयार करण्याचे निकष कोणते ? GHI स्कोअरची गणना(मूल्यांकन) कशी केली जाते ?
जागतिक भूक निर्देशांक यादी तयार करण्यासाठी प्रामुख्याने पुढील चार महत्त्वाचे निकष आधारभूत मानले जातात :
1. कुपोषण (Undernourishment) : यामध्ये देशातील अशा लोकसंख्येचा समावेश होतो ज्यांना दैनंदिन अन्नामध्ये पुरेशा कॅलरी मिळत नाहीत.
2. बालमृत्यू दर (Child Mortality) : दरहजारी आकड्यामागे पाच वर्षांखालील किती मुलांचा मृत्यू झाला.
3. मुलांच्या पोषण स्थितीतील कमतरता (Child Wasting) : पाच वर्षांखालील मुले ज्यांचे वजन त्यांच्या उंचीपेक्षा कमी आहे.
4. मुलांची वाढ खुंटणे (Child Stunting) : पाच वर्षांच्या खालील किती मुलांची त्यांच्या वयाच्या तुलनेत उंची कमी आहे.
या चार पद्धतीने विश्लेषण करून 100 गुणांच्या आधारे मूल्यांकन केलं जातं.
• स्कोअर स्केलवर 0 ते 100 या याच्यात गुण (Score) दिला जातो.
• 0 हा सर्वोत्तम स्कोअर आहे. म्हणजे त्या देशात उपासमारीची समस्या नाही.
• याउलट 100 हा सर्वात वाईट स्कोअर आहे म्हणजे त्या देशात उपासमारीची पातळी सर्वात गंभीर आहे.
(नोट : जितका Score (गुण) कमी तितका त्या देशातील उपासमारीमुळे होणारे मृत्यू चे प्रमाण कमी.)
जागतिक भूक निर्देशांक यादीत भारताची परिस्थिती कशी आहे ?
• 2024 च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 27.3 च्या स्कोअरसह, भारतात भुकेची पातळी गंभीर (Serious) आहे.
• श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश यांसारख्या शेजारील देशांशी तुलना केली असता - यापैकी प्रत्येकाकडे कमी आर्थिक संसाधने आहेत तर तुलनेने संसाधने असुनही भारताची कामगिरी चिंताजनक आहे.
• जागतिक भूक निर्देशांक यादीतील चार महत्त्वाचे निकषांत भारताचे गुण खालील चार्ट मध्ये दिले आहेत :

🧐 तुम्हाला माहित आहे का जागतिक अन्न दिवस केव्हा असतो ?
माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇
चालू घडामोडी 16, ऑक्टोबर 2024
https://www.tcs9.in/mr/current-affairs/chalu-ghadamodi-16-october-2024-or-nsg-raising-day-or-nsg-staphna-din-or-kalleshwar-mandir-or-jagtik-anna-din-2024-or-world-food-day-2024