
चालू घडामोडी 23, ऑक्टोबर 2024 | उडान योजना | UDAN Scheme

उडान योजना
UDAN Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) उडान योजनेबद्दल योग्य पर्याय निवडा.
1. केंद्र सरकारने 21 ऑक्टोबर 2023 रोजी उडान योजना सुरू केली.
2. सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात हवाई प्रवास करता यावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात हवाई प्रवास करता यावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हा पर्याय बरोबर आहे.
ही योजना 21 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू करण्यात आली होती.
बातमी काय आहे ?
• नुकतेच उडान योजनेला 8 वर्षे पूर्ण झाले.
• भारत सरकारने अलीकडेच प्रादेशिक हवाई संपर्क योजना उडान (उडे देश का आम नागरिक) आणखी 10 वर्षांसाठी विस्तारित करण्याची घोषणा केली.
• त्याचबरोबर आणखी 50 विमानतळ सुरू करण्याची किंवा सध्याच्या विमानतळांची क्षमता वाढवण्याची योजना सरकार आखत आहे.
उडान (उडे देश का आम नागरिक) योजना काय आहे ?
What is UDAN (Ude Desh ka Aam Nagrik) Scheme ?
• उडान योजनेचा प्रयत्न जनतेसाठी परवडणाऱ्या दरात प्रादेशिक विमान वाहतूक व्यवस्थेला चालना देणे हा आहे.
• या योजनेची कल्पना विद्यमान धावपट्टी आणि विमानतळांचे पुनरुज्जीवन करून देशातील अत्यल्प तसेच एकही विमान उड्डाण नसलेल्या विमानतळांना कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे.
• केंद्र, राज्य सरकारे आणि विमानतळ चालकांकडून सवलतींच्या स्वरूपात दिले जाणारे आर्थिक प्रोत्साहन निवडक विमान कंपन्यांना देण्यात आले आहे. जेणेकरून नागरिकांना विमानाचे प्रवासशुल्क परवडणारे असेल.
उडान योजना कधी सुरू करण्यात आली ?
• 21 ऑक्टोबर 2016 रोजी उडान योजना सुरू करण्यात आली होती.
• मंत्रालय (Ministry) : ही योजना नागरी उड्डाण मंत्रालय (Ministry of Civil Aviation) ने सुरू केली आहे.
• सुरूवातीला ही योजना 10 वर्षांच्या कालावधीसाठी लॉन्च करण्यात आली.
• नुकतेच भारत सरकारने उडान योजना आणखी 10 वर्षांसाठी वाढवली आहे.
उडान योजने उद्दिष्ट काय आहे ?
उडान योजनेमुळे काय फायदा होणार आहे ?
• सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात हवाई प्रवास करता येईल.
• भारतातील दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी हवाई संपर्क सुधारणे.
• दुर्गम भागांचा विकास आणि व्यापार आणि वाणिज्य आणि पर्यटन विस्तार वाढवणे.
• विमान वाहतूक क्षेत्रात रोजगार निर्मिती.