
चालू घडामोडी 23, ऑक्टोबर 2024 | 44 वा मलेरिया मुक्त देश

44 वा मलेरिया मुक्त देश
"Malaria Free" Country
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) कोणत्या देशाला 44 वा 'मलेरियामुक्त' देश म्हणून घोषित केले.
1. भारत
2. बांग्लादेश
3. इजिप्त
4. ब्राझील
उत्तर : इजिप्त
बातमी काय आहे ?
• अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) इजिप्तला अधिकृतपणे 'मलेरियामुक्त' घोषित केले आहे.
• मलेरिया मुक्त होणारा इजिप्त हा 44 देश ठरला आहे.
मलेरिया आजार कसा होतो ? मलेरियाची प्रसार कसा होतो ?
• मलेरिया हा प्लाज्मोडियम परजीवीमुळे (Plasmodium parasites) होणारा तीव्र तापाचा आजार आहे.
• हा आजार संक्रमित मादी ॲनोफिलीस डासांच्या (Female Anopheles Mosquitoes) चाव्याव्दारे लोकांमध्ये पसरतो.
• हा एक जीवघेणा रोग आहे जो प्रामुख्याने उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळतो.
मलेरिया संसर्गजन्य आजार आहे का ?
• मलेरिया हा संसर्गजन्य आजार नाही.
• मलेरिया एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकत नाही.
• हा आजार मादी ॲनोफिलीस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो.
मलेरिया आजाराची लक्षणे काय असतात ?
• मानवी शरीरात प्लाज्मोडियम परजीवी लाल रक्त पेशींना संक्रमित करतात, ज्यामुळे ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसतात.
• गंभीर प्रकरणांमध्ये, मलेरियामुळे अवयव निकामी होणे, कोमा आणि व्यक्तींचा मृत्यू देखील होऊ शकतो.
उपचार : मलेरियाचे लवकर निदान आणि उपचार केल्याने मलेरिया आजार बरा होतो.
जागतिक मलेरिया दिवस केव्हा असतो ?
• दरवर्षी 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो.
• जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) 2007 मध्ये मलेरियाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी याची स्थापना केली होती.
🧐 तुम्हाला माहित आहे का ?
जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश कोणता ?
👇👇खालील लिंकवर क्लिक करा आणि माहिती मिळवा.
चालू घडामोडी 26, सप्टेंबर 2024