
चालू घडामोडी 24, ऑक्टोबर 2024 | जागतिक पोलिओ दिवस | World Polio Day

जागतिक पोलिओ दिवस
World Polio Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान- रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक पोलिओ दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1) 1 डिसेंबर
2) 14 नोव्हेंबर
3) 24 ऑक्टोबर
4) 5 सप्टेंबर
उत्तर : 24 ऑक्टोबर
जागतिक पोलिओ दिवस साजरा करण्याचा उद्देश काय आहे ?
• पोलिओ लसीकरण आणि पोलिओ निर्मूलनासाठी जागरुकता वाढवणे, तसेच देशांना या आजाराविरुद्धच्या लढ्यात जागरुक राहण्याचे आवाहन करणे यासाठी दरवर्षी 24 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पोलिओ दिवस साजरा करण्यात येतो.
जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबरलाच का साजरी करतात ?
• 24 ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ दिवस (World Polio Day) म्हणून ओळखला जातो.
• रोटरी इंटरनॅशनलने (Rotary International) 24 ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ दिवस म्हणून स्थापन केला.
• जोनास साल्क यांनी पोलिओ विरूद्ध लस विकसित करणाऱ्या पहिल्या टीमचे नेतृत्व केले.
• 24 ऑक्टोबर हा जोनास साल्क (Jonas Salk) यांचा जन्म दिवस आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस दरवर्षी जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
पोलिओ बद्दल महत्त्वाची माहिती :
• पोलिओ (Polio) ज्याला पोलिओमायलिटिस (Poliomyelitis), असेही म्हणतात.
• पोलिओ हा एक विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे.
• पोलिओमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन कायमचा अर्धांगवायू किंवा गंभीर परिस्थितीत मृत्यू देखील होऊ शकतो.
• पाच वर्षांखालील मुलांना पोलिओ प्रामुख्याने होतो.
पोलिओ कसा होतो ?
• पोलिओ विषाणू मुळे पोलिओ हा आजार होतो.
• खोकला किंवा शिंकणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या कचऱ्याच्या (विष्ठा) संपर्कात आल्याने (मल-तोंडी मार्ग) पोलिओ पसरू शकतो
पोलिओ लसीकरण (Polio Vaccination) का महत्त्वाचे आहे ?
• पोलिओवर कोणताही इलाज नाही.
• परंतु पोलिओ लसीने तो प्रभावीपणे रोखला जाऊ शकतो.
• पोलिओ लसीकरणाने लहान मुलांचे पोलिओ पासून संरक्षण केले जाऊ शकते त्याचबरोबर या रोगाचा प्रसार ही थांबवू शकतो.
भारत पोलिओमुक्त (Polio-Free)आहे का ?
• भारत पोलिओमुक्त देश आहे.
• 2014 मध्ये भारताला जागतिक आरोग्य संघटने (World Health Organisation) कडून पोलिओमुक्त देश म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले.