
चालू घडामोडी 25, ऑक्टोबर 2024 | स्कर्वी आजार कसा होतो ?

स्कर्वी आजार कसा होतो ?
What is Scurvy ?
बातमी काय आहे ?
• 15 व्या शतकातील एकेकाळचा सामान्य आजार, स्कर्व्ही, 21 व्या शतकात अनपेक्षित पुनरागमन करत आहे.
• अलीकडील ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातील प्रकरणामुळे स्कर्वी अनपेक्षित पुनरागमन करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान- रोग आणि आजार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्कर्वी हा आजार खालील पैकी कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो.
1. जीवनसत्त्व A
2. जीवनसत्त्व C
3. जीवनसत्त्व D
4. जीवनसत्त्व K
उत्तर : जीवनसत्त्व C
स्कर्वी हा आजार कसा होतो ?
• आहारातील ‘क’ जीवनसत्त्वाच्या (व्हिटॅमिन C) कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो.
• मानव व्हिटॅमिन C चे संश्लेषण करू शकत नाही.
• व्हिटॅमिन C हे बाह्य अन्न स्रोत, विशेषत: फळे आणि भाज्या किंवा फोर्टिफाइड खाद्यपदार्थांमधून येणे आवश्यक आहे.
• त्यामुळे आहारात पुरेशी ताजी फळे आणि भाज्या न खाल्ल्याने स्कर्व्ही होतो.
• तसेच, स्वयंपाक केल्याने उष्णतेमुळे अन्नामधील आढळणारे व्हिटॅमिन C काही प्रमाणात नष्ट होते.
स्कर्वी या आजाराची लक्षणे काय असतात ?
• अशक्तपणा, थकवा आणि हात व पाय दुखणे, हिरड्यांचे आजार, केसांमध्ये बदल आणि त्वचेतून रक्तस्त्राव होऊ शकतो.
• उपचार न केल्यास आजार प्राणघातक ठरू शकतो.
जीवनसत्त्व क (व्हिटॅमिन C) बद्दल महत्त्वाची माहिती :
• व्हिटॅमिन C चे वैज्ञानिक नाव एस्कॉर्बिक आम्ल(Ascorbic Acid) असे आहे.
• जीवनसत्त्व क (व्हिटॅमिन C) हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे.
• पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात आणि उरलेले जीवनसत्व लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडते.
• शरीरातील पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांची कमतरता टाळण्यासाठी ते नियमितपणे घ्यावे लागतात.
जीवनसत्त्व क (व्हिटॅमिन C) काय काम करत ? ते शरीराला आवश्यक का असतं ?
• शरीराच्या सर्व भागांतील ऊतींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी व्हिटॅमिन C आवश्यक आहे.
• त्वचा, हाडांचे, दात आणि हिरड्यांचे आरोग्य व्यवस्थित राखण्यास मदत करते.
• आपल्या रक्तवाहिन्या योग्यरित्या कार्य करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन C आवश्यक आहे.
• व्हिटॅमिन C शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करते, लोह ( Iron) हे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते.
• व्हिटॅमिन C हे अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे ते तुमच्या शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देते.
• (फ्री रॅडिकल्समुळे (Free Radicals ) कर्करोग, हृदयविकार आणि संधिवातासारखे आजार होऊ शकतात.)
जीवनसत्त्व क (व्हिटॅमिन C) चे स्त्रोत कोणते ?
• फळे आणि पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन C असते.
• फळे - संत्री, लिंबू, किवी फळ, आंबा, पपई, अननस, स्ट्रॉबेरी इत्यादी.
• पालेभाज्या - ब्रोकोली,मिरची, पालक, कोबी इत्यादी.
🧐 तुम्हाला मलेरिया आजार कसा होतो, त्यावर उपाय काय याबद्दल माहिती आहे का ?
जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇
चालू घडामोडी 23, ऑक्टोबर 2024 | 44 वा मलेरिया मुक्त देश