
चालू घडामोडी 26, ऑक्टोबर 2024 | सिमबेक्स युद्ध अभ्यास | Exercise SIMBEX

सिमबेक्स युद्ध अभ्यास
Exercise SIMBEX
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकताच सिमबेक्स हा नौदल सराव पार पडला. हा नौदल सराव खालील पैकी कोणत्या देशांमध्ये झाला ?
1) भारत आणि श्रीलंका
2) भारत आणि ऑस्ट्रेलिया
3) भारत आणि सिंगापूर
4) भारत आणि ओमान
उत्तर : भारत आणि सिंगापूर
बातमी काय आहे ?
• सिंगापूर आणि भारत यांमधील द्विपक्षीय नौदल युद्ध सराव 23 ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होणार आहे.
• दोन्ही देशांमधील सिमबेक्स (SIMBEX) या नौदल युद्ध अभ्यासाची यंदाची 31 वी आवृत्ती आहे.
• या युद्ध सरावाचे आयोजन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे करण्यात आले.
• हा सराव दोन टप्प्यात केला जाईल- हार्बर टप्पा आणि सागरी टप्पा.
सिमबेक्स या नौदल युद्ध अभ्यासाचे उद्दिष्ट काय आहे ?
सिमबेक्स हा नौदल युद्ध सराव करण्यामागील हेतू काय ?
• भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या नौदलांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देणे हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे.
• भारत आणि सिंगापूर यांच्यातील सामुहिक भागीदारी अधिक मजबूत करणे.
• दोन्ही देशांच्या नौदलांमधील आंतरकार्यक्षमता वाढवणे.
• सागरी क्षेत्रातील संरक्षणा संदर्भात जागरूकता वाढवणे.
• समान सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी एकमेकांशी सहकार्य वाढवणे आहे. हे या वर्षीच्या आवृत्तीचे उद्दिष्ट आहे.
सिमबेक्स (SIMBEX) या नौदल युद्ध अभ्यासाची सुरूवात केव्हा झाली ?
• सिमबेक्स या नौदल युद्ध सरावाची सुरूवात 1994 मध्ये झाली.
• हा युद्ध अभ्यास दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
• सिंगापूर आणि भारत आळीपाळीने या युद्ध सरावाचे आयोजन करतात.
• 30 वा सिमबेक्स या नौदल युद्ध सराव सिंगापूरने आयोजित केला होता.
• यंदाचा 31 वा भारताने आयोजित केला आहे.
🧐 तुम्हाला हे माहित आहे का ?
मालाबार युद्ध अभ्यास 2024 कोणासोबत झाला ? 👇👇
चालू घडामोडी 09, ऑक्टोबर 2024