
चालू घडामोडी 26, ऑक्टोबर 2024 | प्रधानमंत्री मुद्रा योजनेत नवीन बदल

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत नवीन बदल
Pradhan Mantri Mudra Yojana
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत नवीन ‘तरुण प्लस’ श्रेणी सुरू केली आहे.
2. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत विनातारण कर्ज (Collateral-Free Loans) दिले जाते.
3. एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली.
4. वरील सर्व पर्याय योग्य आहेत.
उत्तर : वरील सर्व पर्याय योग्य आहेत.
बातमी काय आहे ?
• सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) नवीन ‘तरुण प्लस’ श्रेणी सुरू केली आहे.
• ‘तरुण प्लस’ श्रेणी अंतर्गत कर्ज मर्यादा 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल महत्त्वाची माहिती :
• MUDRA, ज्याचा अर्थ Micro Units Development & Refinance Agency Ltd आहे.
• ही कर्जे देण्यासाठी सरकारने स्थापन केलेली वित्तीय संस्था आहे.
• मुद्रा संस्था व्यक्तींना थेट कर्ज देत नाही.
प्रधानमंत्री मुद्रा योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
• एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली.
• बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु किंवा सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली.
• ‘तरुण प्लस’ श्रेणी अंतर्गत आता ही कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
• प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत विनातारण कर्ज (Collateral-Free Loans) दिले जाते.
• याशिवाय कमी कागदपत्रे आणि जलद प्रक्रिया, कमी व्याजदर व कर्जासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्कही आकारले जात नाही.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची प्रमुख उद्दिष्टे कोणती ?
केंद्र सरकारची मुद्रा योजना ची प्रमुख दोन उद्दिष्टे आहेत.
• स्वयंरोजगारासाठी सोपे कर्ज : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक सहाय्य साधन आहे, ज्यामुळे उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक भांडवल मिळू शकते.
• छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे : यामुळे अर्थव्यवस्थेत रोजगारनिर्मितीला चालना मिळते आणि देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान होते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या कर्जाच्या श्रेणी (प्रकार) कोणत्या ?
कर्जाची गरज आणि व्यवसायाच्या परिपक्वतेच्या टप्पा या आधारे कर्जाची श्रेणींमध्ये विभागणी केली गेली आहे.
1. शिशु श्रेणी : 50,000 रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात.
2. किशोर श्रेणी : 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतची कर्ज किशोर कर्जांतर्गत दिली जाते.
3. तरुण श्रेणी : तरुण कर्जाखाली 5 लाख ते 10 लाखांपर्यंतची कर्जे दिली जातात.
4. तरुण प्लस’ श्रेणी :
• ही श्रेणी नुकतीच लागू करण्यात आली आहे.
• तरुण प्लस’ श्रेणी अंतर्गत कर्ज मर्यादा 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत.
• ज्या उद्योजकांनी तरुण श्रेणी अंतर्गत मागील कर्जाचा लाभ घेतला आहे आणि यशस्वीरित्या परतफेड केली आहे त्यांच्यासाठी तरुण प्लस श्रेणी उपलब्ध असेल.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या संस्था कोणत्या ?
प्रधानमंत्री योजना मुद्रा योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना कर्ज देणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत.
• सार्वजनिक बँका
• खाजगी क्षेत्रातील बँका
• राज्य संचालित सहकारी बँक
• क्षेत्रीय ग्रामीण बँक
• सूक्ष्म वित्तीय संस्था (Micro Finance Institutions)
• बँकेतर वित्तीय कंपन्या (Non-Banking Financial Companies)
🧐 काय आहे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ ?
महत्त्वाच्या नोट्स साठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇
चालू घडामोडी 6, सप्टेंबर 2024