
चालू घडामोडी 28, ऑक्टोबर 2024 | भू-आधार म्हणजे काय ?
![[ Bhu-Aadhar, bhuaadhar, Unique Land Parcel Identification Number, Digital India Land Records Modernisation Programme, jaminichi mahiti, jaminichi kharedi, jaminichi vikri, computerized land records, government initiative to land reform, sarkarche jamin sudharana dhorand, land reform in india, bhartatil jamin sudharana MPSC, ULPIN, State Code, District Code, Sub District Code, Village Code, Unique Plot ID Number, Rajya code, Jilha Code, Upjillha Code, Gavacha Code, Unique Plot ID kramank, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Bhu_Aadhar_1730262491788.webp)
भू-आधार म्हणजे काय ? | Bhu-Aadhar
बातमी काय आहे ?
ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सुमारे ३० टक्के ग्रामीण जमीन भूखंडांना भू-आधार म्हणजेच युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) देण्यात आला आहे.
Subject : GS - राज्यशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील पर्यायांपैकी भू-आधार संदर्भात योग्य असणारा पर्याय निवडा.
1. भू-आधार हा एक 10 अंकी नंबर आहे. जो जमिनीची ओळख करून देतो.
2. भू-आधार केंद्र सरकारच्या जमिन आधुनिकीकरण कार्यक्रमचा भाग म्हणून 2021 मध्ये लाँच करण्यात आला.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : भू-आधार केंद्र सरकारच्या जमिन आधुनिकीकरण कार्यक्रमचा भाग म्हणून 2021 मध्ये लाँच करण्यात आला. हा पर्याय बरोबर आहे.
• भू-आधार हा एक 14 अंकी नंबर आहे.
भू-आधार म्हणजे काय ?
Unique Land Parcel Identification Number (ULPIN) म्हणजे काय ?
• भू-आधार हा एक 14 अंकी नंबर आहे. जो जमिनीची ओळख म्हणजे जमीनीचा मालकी हक्क, क्षेत्रफळ, सीमा, यांबद्दल माहिती सांगतो.
• भू-आधारला युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (Unique Land Parcel Identification Number) म्हणूनही ओळखले जाते.
• भू-आधार हे केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम (DILRMP) चा भाग म्हणून 2021 मध्ये लाँच करण्यात आला.
14-अंकी भू-आधार (ULPIN)मध्ये काय असतं ?
• जमिनीच्या पार्सलला म्हणजे च जमिन भूखंडाला 14 अंकी एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो.
• जो लँड पार्सलचे रेखांश आणि अक्षांश निर्देशांक वापरून तयार केला जातो.
• 14-अंकी भू-आधार (ULPIN)मध्ये खालील माहिती अंतर्भूत असते:
1. राज्य कोड (State Code)
2. जिल्हा कोड (District Code)
3. उप-जिल्हा कोड (Sub-district Code)
4. गावाचा कोड (Village Code)
5. युनिक प्लॉट आयडी क्रमांक (Unique Plot ID Number)
भू-आधार चे प्रमुख उद्दिष्टे काय आहेत ?
• जमिनीच्या प्रत्येक प्लॉटला सहज ओळखण्यासाठी आणि नोंदी मिळवण्यासाठी एक युनिक ओळखपत्र प्रदान करणे.
• जमीन मालक, भूखंडाच्या सीमा, क्षेत्रफळ, जमीनीचा वापर इत्यादी तपशीलांसह अचूक डिजिटल जमीन अभिलेख तयार करणे.
• जमिनीच्या नोंदी आणि मालमत्ता नोंदणी प्रक्रिया जोडणे
• भूमी अभिलेख सेवांचे ऑनलाइन वितरण सुलभ करण्यासाठी
• अद्ययावत जमीन डेटा राखून सरकारी नियोजनात मदत करणे