
चालू घडामोडी 28, ऑक्टोबर 2024 | दाना चक्रीवादळ | Cyclone Dana
![[ Cyclone Dana, tropical cyclone, Dana chakrivadal, chakrivadal kase tayar hotat, chakrivadalana nave kon det, geography notes, cyclone notes, Cyclone, Hurricane, Typhoon, Willy Willy, World meteorological organisation, weather forecast, havaman report, ajche havaman, meteorological department of India, havaman khat, ministry of environment, ushankatibhandhiya chakrivadal, bangalcha upsagratil chakrivadal, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Dana_Chakrivadal_1730262178723.webp)
दाना चक्रीवादळ
Cyclone Dana
बातमी काय आहे ?
दाना चक्रीवादळ आणि त्यामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे ओडिशातील १.७५ लाख एकर जमिनीवरील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचे, तसेच २.८० लाख एकर जमिनीवरील पिके बुडिताखाली गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Subject : GS - भूगोल- हवामान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच ओडिशातील किनारपट्टीच्या भागात दाना चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, चक्रीवादळाला दाना हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?
1. भारत
2. पाकिस्तान
3. कतार
4. श्रीलंका
उत्तर : कतार
दाना चक्रीवादळ बद्दल
• दाना हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे.
• बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ते निर्माण झाले.
• भारतातील पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांत दाना चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
चक्रीवादळाला "दाना" हे नाव कोणी दिले ?
• चक्रीवादळ "दाना" हे नाव कतारने दिले आहे.
• "दाना हा अरबी शब्द असून त्याला अरबी संस्कृतीत खूप महत्त्व आहे.
• त्याचा अर्थ 'सर्वात परिपूर्ण आकाराचा, मौल्यवान आणि सुंदर मोती' असा आहे.
चक्रीवादळाला नाव का देण्यात येते ?
• सामान्य लोकांना हवामानाची माहिती किंवा इशारा देताना केवळ वादळाची आकडेवारी किंवा तांत्रिक संज्ञांऐवजी नावं वापरणं सोपं जातं त्याचप्रमाणे हवामान तज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून चक्रीवादळाचे नामकरण केले जाते.
चक्रीवादळांना नाव कोण देतात ?
• WMO (वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन) ही संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. त्यांनी जगभरातील वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे.
• उत्तर हिंद महासागरातील चक्री वादळंना , उष्णकटिबंधीय चक्रीवादळ प्रादेशिक संस्था (Tropical Cyclone Regional Body) द्वारे नाव देण्यात येते.
• उष्णकटिबंधीय चक्रीवादळ प्रादेशिक संस्था (TCRB) ही 13 देशांनी मिळून बनलेली संस्था आहे.
• या संस्थेत बांगलादेश, भारत,पाकिस्तान, मालदीव, म्यानमार, , श्रीलंका, ओमान, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या 13 देशांचा समावेश आहे.
• एखाद्या प्रदेशातील सदस्य देश त्यांच्यातर्फे नावं सुचवतात आणि विशिष्ठ क्रमानं त्याच नावांमधून चक्रीवादळाला नावं दिलं जातं.
• नावे उच्चारायला बऱ्याचदा सोपी असतात, सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित असतात.
चक्रीवादळ म्हणजे काय ? आणि ते कसे तयार होतात ?
• काही स्थानिक कारणांमुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी कमी दाबाचे केंद्र निर्माण होते आणि त्याच्या सभोवती हवेचा जास्त दाब होत जातो. यामुळे वारे चक्राकार गतीने कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने आकर्षिली जातात, त्याच आवर्त किंवा चक्रीवादळ असे म्हणतात.
• चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (Anti-Clockwise) फिरतात
• आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने (Clockwise) फिरतात.
चक्रीवादळांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते ते पुढीलप्रमाणे :
• हिंदी महासागरातील वादळाला चक्रीवादळ (Cyclone) म्हटले जाते.
• वेस्ट इंडिज आणि अटलांटिकमधील वादळाला हरिकेन (Hurricane) नावाने ओळखले जाते
• पॅसिफिक महासागर व चिनी समुद्रातील वादळाला टायफून (Typhoon) या नावाने ओळखले जाते.
• ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील वादळाला विली-विली (Willy-Willy) या नावाने ओळखले जाते.