
चालू घडामोडी 28, ऑक्टोबर 2024 | पिंक कोकेन म्हणजे काय ?
![[ Pink Cocaine, drugs, drugs Che ghatakmparinam, Pink Cocaine kay ahe, Pink Cocaine Che dushparinam, impact of drugs on body, chemistry notes, vinyan ani tantradnyan notes, science notes, rasayanshastra notes, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Pink_Cocaine_1730262731272.webp)
पिंक कोकेन म्हणजे काय ?
Pink Cocaine
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेले पिंक कोकेन बद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. पिंक कोकेनला रंग येण्यासाठी फूड कलर वापरले जाते.
2. पिंक कोकेनमुळे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब मनोविकृतीवर परिणाम यांसारखे घातक परिणाम होतात.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
बातमी काय आहे ?
• ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन आणि एपिडेमियोलॉजिस्टच्या मते, “पिंक कोकेन” अमेरिकन शहरांमधील क्लब सीनचा एक धोकादायक आणि वाढता लोकप्रिय भाग बनला आहे.
• स्पेन, ब्रिटन आणि त्यापलीकडेही अनेक देशांमध्ये पिंक कोकेन चिंतेचा विषय ठरत आहे.
पिंक कोकेन म्हणजे काय?
• सामान्यतः कोकेनचा हा प्रकार पावडर किंवा गोळ्यांच्या स्वरूपात आढळतो.
• पिंक कोकेनमध्ये आढळणाऱ्या सामान्य घटकांमध्ये MDMA, मेथॅम्फेटामाइन, केटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, क्रॅक आणि कॅफीन तसेच इतर विविध पदार्थांचे मिश्रण असते.
• MDMA सामान्यतः एक्स्टसी म्हणून ओळखले जाते, ते अतिशय उत्तेजक असते.
• तर केटामाइन हा अमली पदार्थ घेतल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची नशा येते.
• केटामाइन हे भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधात वापरले जाते.
पिंक कोकेनला पिंक रंग कसा काय ?
• पिंक कोकेन त्याच्या रंगासाठी ओळखले जाते. लोक त्याकडे आकर्षित व्हावेत यासाठी त्याला एक रंग देण्यात आला आहे.
• हे कोकेन फूड कलर आणि स्ट्रॉबेरी किंवा इतर अर्क वापरून रंगीत केले जाते.
पिंक कोकेन सर्व प्रथम कुठे पाहण्यात आले ?
लॅटिन अमेरिकेतील पार्टी सीनवर या ड्रगला लोकप्रियता मिळाली आणि आता ते युरोपमध्ये पसरले आहे.
पिंक कोकेनची इतर नावे कोणती ?
पिंक कोकेनची ‘कोकेना रोसाडा’, ‘ट्युसी’, ‘व्हीनस’ व ‘इरॉस’ अशी अनेक नावे आहेत.
पिंक कोकेनचे आरोग्यावर काय परिणाम होतात ?
हे भ्रम (Hallucinations) निर्माण करू शकते, श्वासोच्छवास आणि हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, स्ट्रोकचा वाढलेला धोका, वर्तणुकीतील बदल, व्यसन, चिंता, नैराश्य आणि अगदी मनोविकृतीवर परिणाम यांसारखे घातक परिणाम पिंक कोकेनमुळे होऊ शकतात.