
चालू घडामोडी 29, ऑक्टोबर 2024 | कृत्रिम गर्भाधारणाद्वारे माळढोक पक्ष्याचा जन्म
![[ Great Indian bustard, IUCN Red List, Critically Endangered species, Ardeotis nigriceps, maldhok, maldhok abhayaranya, Solapur abhayaranya, Nanak abhayaranya, Rajasthan State bird, maldhok kontya rajyacha rajyapakshi ahe, jagatil pahila, MPSC paryavaran notes Marathi madhe, environment notes, MPSC paryavaran topic, Wildlife (Protection)Act, 1972, vanyajiv sanvrakshan kayda, maharashtratil abhayaranya,Artificial Insemination, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Artificial_Birth_of_Maldhok_Bird_1730263701262.webp)
कृत्रिम गर्भाधारणाद्वारे माळढोक पक्ष्याचा जन्म
Great Indian Bustard
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे कृत्रिम गर्भाधारण पद्धतीने माळढोक पक्षाचे यशस्वी प्रजनन करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला. तर हे कृत्रिम गर्भाधारणा कोणत्या राज्यात करण्यात आली ?
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. आंध्र प्रदेश
4. राजस्थान
उत्तर : राजस्थान
बातमी काय आहे ?
• अलीकडे, प्रथमच, कृत्रिम गर्भाधारणाद्वारे (Artificial Insemination) माळढोक पक्ष्याचा जन्म झाला.
• याचा जन्म राजस्थानमधील जैसलमेर येथील सुदासारी प्रजनन केंद्रात झाला.
• कृत्रिम गर्भाधारण पद्धतीने माळढोक पक्षाचे यशस्वी प्रजनन करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला.
माळढोक पक्ष्याबददल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारतातील माळरानात आढळणारा एक पक्षी आहे.
• माळढोक या पक्ष्याचे शास्त्रीय नाव “आर्डेओटिस नायग्रिसेप्स” (Ardeotis Nigriceps) असे आहे.
• माळढोक पक्षाला ग्रेट इंडियन बस्टर्ड (Great Indian Bustard) नावाने ओळखले जाते.
• माळढोकाचे वैशिष्ट्य हे की, तो जमिनीवर वावरत असला, तरी आकाशात उडू शकणारा सर्वांत मोठा पक्षी आहे.
• (शहामृग व एमू हे पक्षी आकाशात उडू शकत नाही.)
• हा राजस्थानचा राज्य पक्षी आहे.
• गवताळ प्रदेश किंवा गवताळ प्रदेश परिसंस्थेचे आरोग्य सूचक म्हणून माळढोक पक्षाला ओळखले जाते.
• धान्ये, भुईमुगाच्या व इतर वनस्पतींच्या शेंगा,बोरे तसेच टोळ, भुंगेरे व इतर कीटक, गोम, पाली, सरडे यांचा समावेश त्यांच्या आहारात होतो.
माळढोक पक्षी कोठे आढळतात ?
• भारत आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये माळढोक पक्षी आढळतो.
• माळढोक पक्षी प्रामुख्याने राजस्थानच्या थार वाळवंटात आढळतात.
• तसेच महाराष्ट्रात सोलापूर आणि अहमदनगर
• कर्नाटकात - बेल्लारी आणि हावेरी
• आंध्र प्रदेशात कुर्नूल च्या शुष्क प्रदेशात आढळतात.
• तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात माळढोक पक्षी आढळतात.
माळढोक पक्षांचे संवर्धन :
आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत (IUCN Red List) गंभीरपणे धोक्यात (Critically Endangered) या श्रेणींमध्ये माळढोक पक्षाची नोंद करण्यात आली आहे.
• माळढोक पक्षाची वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मध्ये अनुसूची १ मध्ये नोंद आहे.
माळढोक पक्षाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सरकारतर्फे अभयारण्ये घोषित केली आहेत.
नान्नज अभयारण्य
• महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकूरी येथील माळढोक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राखीव आहे.
• नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.
• हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे