
चालू घडामोडी 30, ऑक्टोबर 2024 | कोणार्क मंदिर
![[ Konark mandir, Konark surya mandir, Konark Sun Temple, black Pagoda temple, Odisha temple, Hindu temple, MPSC art and culture notes, history, Itihas, temple architecture in India notes, Kala ani sanskruti, mandir sthapatyashastra notes, bhartatil mandir, Unesco world heritage site, Unesco jagtik varsa stal, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Konark_Mandir_1730345725538.webp)
कोणार्क मंदिर
Konark Sun Temple
Subject : GS - इतिहास- कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात अलीकडेच कोणार्क मंदिराचा संदर्भ दिला. तर हे कोणार्क मंदिर खालील पैकी कोणत्या राज्यात आहे ?
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. ओडिशा
4. कर्नाटक
उत्तर : ओडिशा
बातमी काय आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात अलीकडेच ओडिसी नृत्य आणि कोणार्क मंदिराचा संदर्भ दिला होता.
कोणार्क मंदिरा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• कोणार्क मंदिराला सूर्य मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे सूर्य देवाला समर्पित आहे.
• ओडिशा राज्याच्या पुरी जिल्ह्यातील कोणार्क गावामध्ये हे सूर्य मंदिर स्थित आहे.
कोणार्क मंदिर कोणी बांधले ?
• कोणार्क मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर आहे.
• पूर्व गंगा राजघराण्यातील राजा नरसिंह पहिला यांनी १२५० मध्ये कोणार्क मंदिर बांधले.
• 1984 मध्ये कोणार्क मंदिराला UNESCO चे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.
कोणार्क मंदिराचे वैशिष्ट्ये काय आहे ?
• हे ओडिशा वास्तुकला किंवा कलिंग वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
• प्रचंड आकाराची बारा चाकांची जोडी (एकूण 24 चाके) असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले सात घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे.
• मंदिराच्या संकुलात 100 फूट उंचीचा सूर्य रथ आहे.
• या रथाला एकूण 24 चाके आहेत.
• या रथाला 7 घोडे खेचले आहेत, आणि हे सात घोडे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आहेत असे म्हटले जाते.
• मंदिरात हिंदू पौराणिक कथांमधील दृश्ये दर्शविणारी विस्तृत दगडी कोरीवकाम देखील आहे.
कोणार्क सूर्य मंदिराला 'ब्लॅक पॅगोडा' (BLACK PAGODA) असे का म्हणतात ?
• मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या गडद दगडांमुळे याला 'ब्लॅक पॅगोडा' म्हणून ओळखले जाते.
• कोणार्क सूर्य मंदिर समुद्राच्या अगदी जवळ आहे आणि म्हणून युरोपियन खलाशांनी या विलक्षण मंदिराचा उपयोग नेव्हिगेशन पॉइंट म्हणून केला.
• मंदिराचे देवस्थान किंवा मोठा बुरुज काळ्या रंगात दिसला आणि म्हणून त्याला ब्लॅक पॅगोडा म्हटले गेले.
• पॅगोडा (Pagoda) चा अर्थ : मनोऱ्यासारखे बांधलेले किंवा अनेक माळे असलेले मंदिर असा होतो.