
चालू घडामोडी 31, ऑक्टोबर 2024 | डॉ. होमी जहांगीर भाभा | Dr. Homi Jehangir Bhabha
![[ Puraskar, sanman, Padma Bhushan puraskar, Adams Award, Hopkins Prize,Cambridge Philosophical Society, bhartacha Nagri puraskar, Bhabha anusanshodhan Kendra, turbhe anusanshodhan Kendra, Bhabha Atomic Research Centre, Nobel prize, Nobel puraskar, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Homi_Jahangir_Bhabha_1730612368440.webp)
डॉ. होमी जहांगीर भाभा
Dr. Homi Jehangir Bhabha
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणाला भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते ?
1. डॉ. होमी जहांगीर भाभा
2. डॉ. विक्रम साराभाई
3. डॉ. उडुपी रामचंद्र राव
4. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
उत्तर : डॉ. होमी जहांगीर भाभा
• डॉ. होमी जहांगीर भाभा - भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक (Father of India's Nuclear Programme)
• डॉ. विक्रम साराभाई - भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक (Father of the Indian Space Programme)
• डॉ. उडुपी रामचंद्र राव - सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया (Satellite Man of India)
• डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - मिसाइल मॅन ऑफ इंडिया (Missile Man of India)
![[ Dr. Homi Jehangir Bhabha, Tata Institute of Fundamental Research , (TIFR), Atomic Energy Establishment, Trombay, Bhabha Atomic Research Centre (BARC), director of the nuclear program, anuurja ayog, father of India's nuclear programme, sanchalak ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Homi_Jahangir_Bhabha_1_1730620920473.webp)
डॉ. होमी जहांगीर भाभा यांबद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• जन्म : डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे एका सधन पारशी कुटुंबात झाला.
• इ.स. १९४५ मध्ये भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली.
• टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचे ते संचालक होते.
• १९४८ मध्ये भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी जहांगीर भाभा यांची नेमणूक झाली.
• ऑगस्ट १९५४ मध्ये स्वतंत्र अणुऊर्जा खात्याची स्थापना करण्यात आली. या खात्याचे सचिवपद डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्याकडेच होते.
• अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते.
• डॉ. होमी भाभा यांनी अणू ऊर्जा तंत्रज्ञानात रचलेल्या पायामुळे आज भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला.
• डॉ. होमी भाभा यांना भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक (Father of India's Nuclear Programme) म्हणून ओळखले जाते.
मृत्यू : 24 जानेवारी 1966 रोजी होमी भाभा यांचे भयंकर विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले
![[ Dr. Homi Jehangir Bhabha, Tata Institute of Fundamental Research , (TIFR), Atomic Energy Establishment, Trombay, Bhabha Atomic Research Centre (BARC), director of the nuclear program, anuurja ayog, father of India's nuclear programme, sanchalak ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Homi_Jahangir_Bhabha_2_1730610587037.webp)
पुरस्कार आणि सन्मान :
• भारतीय व परदेशीय विद्यापीठांच्या अनेक सन्माननीय पदव्या त्यांना मिळाल्या.
• भाभा यांना १९४२ मध्ये केंब्रिज विद्यापीठाचे अँडम्स पारितोषिक (Adams Award) मिळाले.
• १९४८ मध्ये केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे हॉपकिन्स पारितोषिक (Hopkins Prize)मिळाले.
• १९५४ साली त्यांना पद्मभूषण हा बहुमान भारत सरकारतर्फे देण्यात आला.
• भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारासाठीही डॉ. होमी जहांगीर भाभा यांना नामांकन मिळाले होते.