
चालू घडामोडी 31, ऑक्टोबर 2024 | वीर राणी चेन्नम्मा कोण होती ? | Kittur Rani Channamma
![[ bhartacha Swatantra Sangram,Kittur Rani Channamma, Adhunik bhartacha Itihas, britishanche Khalsa dhoran doctrine of lapse, yudha, bhartatil sansthan, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Rani_Chennama_1730611888019.webp)
वीर राणी चेन्नम्मा कोण होती ?
Kittur Rani Channamma
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वीर राणी चेन्नम्मा खालीलपैकी कोणत्या संस्थानाच्या राणी होत्या ?
1. झांशी संस्थान
2. कित्तूर संस्थान
3. मगध संस्थान
4. हैदराबाद संस्थान
उत्तर : कित्तूर संस्थान
बातमी काय आहे ?
कित्तूर विजयोत्सवाच्या 200 व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले.
Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास
वीर राणी चेन्नम्मा कोण होती ?
• राणी चेन्नम्माचा जन्म आजच्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील काकती या छोट्या गावात झाला.
• राणी चेन्नम्माचे शिक्षण राजकुळानुसार झाले.
• घोडेस्वारी, शस्त्राचा सराव करणे हे सारे त्या वडिलांकडून शिकल्या.
• राज्यकारभाराच्या अभ्यासाबरोबरच कन्नड, उर्दू , मराठी व संस्कृत या भाषांचा त्यांचा अभ्यास होता.
• वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी कित्तूरचा राजा मल्लसर्जा यांच्याशी विवाह केला.
• 1816 मध्ये राजा मल्लसर्जाच्या मृत्यूनंतर, त्याचा मोठा मुलगा, शिवलिंगरुद्र सर्जा, सिंहासनावर बसला.
• पण शिवलिंगरुद्राची तब्येत बिघडल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला.
• 1824 मध्ये शिवलिंगरुद्र सर्जा यांनी मृत्यूपूर्वी, उत्तराधिकारी म्हणून शिवलिंगप्पा या मुलाला दत्तक घेतले.
• परंतु, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने शिवलिंगप्पा यांना राज्याचा उत्तराधिकारी म्हणून ओळखण्यास नकार दिला.
• दत्तक विधान नामंजूर करून कित्तूर राज्य आणि तेथील संपत्ती ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आणावी यासाठी ब्रिटीशांनी फोडा आणि राज्य करा रणनिती आखली.
• इंग्रजांच्या दत्तक वारस नामंजुरीच्या धमकवण्यांना राणी चेन्नम्माने सडेतोड उत्तर दिले.
• कित्तूर राज्याच्या वारसदारांचा प्रश्न हा राज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कित्तूर हे एक स्वतंत्र राज्य आहे आणि ते स्वतंत्र राहील. असे त्यांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले.
ब्रिटिशांविरुद्धची लढाई :
लढाईचा पहिला टप्पा :
• 1824 मध्ये, 20,000 ब्रिटिश सैनिकांचा ताफा कित्तूर किल्ल्याच्या पायथ्याशी तैनात होता. ब्रिटिशांनी कित्तूरवर आक्रमन केले.
• लढाईच्या सुरुवातीच्या टप्प्यात, राणी चेन्नम्मा यांच्या नेतृत्वाखालील कित्तूर सैन्याने, ब्रिटिशांवर विजय मिळवला.
• अनेक गोरे अधिकारी मारले गेले तर अनेक इंग्रज अधिकार्यांना कैदी बनवले गेले.
• राणीने उदारपणे कैदेत असलेल्या ब्रिटीश अधिकार्यांना सोडून दिले.
लढाईचा दुसरा टप्पा :
• डिसेंबर 1824 मध्ये मोठ्या शक्तीनिशी आणि आधुनिक शास्त्रास्रे घेऊन ब्रिटीश पुन्हा कित्तूरवर तुटून पडले.
• कित्तूरच्या देशभक्त सैन्याने राणीच्या नेतृत्वाखाली मोठ्या जिद्दीने शत्रूशी युद्ध केले.
• देशद्रोहांच्या कारवायांमुळे आणि इंग्रजांच्या प्रचंड तोफा, बलाढ्य मोठे सैन्य तसेच त्यांचे फोडा आणि फितुरीमुळे राणी चेन्नम्माला कैद करण्यात इंग्रजांना यश मिळाले.
• राणी चेन्नम्माला बैलहोंगल किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले होते, तेथे 21 फेब्रुवारी 1829 रोजी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.