
चालू घडामोडी 01, नोव्हेंबर 2024 | वारली पेंटिंग | Warli Painting
![[ Warli Painting, Warli chitrakala, Adivasi chitrakala, art and culture, Kala ani sanskruti, Bhartiya sanskruti, mural painting, mural art, bhittchitra, bhintivaril Chitra, chitrakala, MPSC art and culture notes, history, Itihas, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Warli_Painting_1730612831682.webp)
Warli Painting
वारली पेंटिंग
बातमी काय आहे ?
काझान येथे नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत भारताच्या पंतप्रधानांनी उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींना महाराष्ट्रातील वारली पेंटिंग भेट दिली.
Subject : GS - इतिहास- कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणती चित्रकला महाराष्ट्राची आहे ?
( तलाठी भरती 2019, महाराष्ट्र पोलीस भरती)
1. कलाम
2. वारली
3. लघुचित्र
4. मधुबनी
उत्तर : वारली
वारली चित्रकला
वारली वस्ती कोठे आढळते ?
महाराष्ट्रातील उत्तर सह्याद्री पर्वत रांगेतील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, नाशिक जिल्ह्याचा काही भाग तसेच गुजरातचा डांग, वलसाड, सुरत चा भाग, दादर - नगर हवेली, दिव आणि दमणचा काही भाग येथे वारली आदिवासींची वस्ती आहे.
वारली चित्रकला कशी असते ? आणि तिचा शोध केव्हा लागला ?
• वारली चित्रकला ही मुख्यत्वे स्त्रियांची चित्रकला आहे.
• विवाहाच्या वेळी चित्र काढणाऱ्या चित्रकर्तीस धवरलेली असे म्हणतात.
• हा आदिवासी कला प्रकार भारतातील सर्वात प्राचीन कलाकृतींपैकी एक आहे, त्याची मुळे सुमारे इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूर्वीची आहे.
• परंतु वारली चित्रकलेच्या विशिष्ट शैलीचा शोध प्रथमतः 1970 च्या दशकात दिसतो.
चित्र काढण्याची पद्धत अथवा स्वरूप कसे असते? त्यासाठी कोणत्या रंगांचा वापर केला जातो ?
• चित्र काढण्यापूर्वी भिंत माती अथवा शेणाने सारवली जाते.
• चित्रासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो; जसे की तांदळापासून पांढरा विटांपासून लाल झाडांच्या पानांपासून हिरवा इत्यादी.
• भौमितिक आकारांचा वापर करून चित्र रेखाटले जाते.
• वारली चित्रांतील रचना गोल,त्रिकोण, चौकोन इत्यादी भौमितिक आकारांचा वापर करून केली जाते.
• हे भौमितिक आकार नैसर्गिक घटकांना दर्शवण्यासाठी वापरलली आहे.
• उदाहरणार्थ, वर्तुळ हे सूर्य आणि चंद्र दाखवण्यासाठी, त्रिकोण पर्वतांसाठी तर चौरस हे चित्रकलेचे मध्यवर्ती स्वरूप मानले जातात.
वारली चित्रकलेची संकल्पना (थीम) काय असते ?
वारली जमातीचे ग्रामीण जीवनाची दैनंदिन दिनचर्या, आदिवासी लोकांचे निसर्गाशी असलेले नाते, त्यांचे देव,पुराण, परंपरा, चालीरीती, सण- उत्सव ही वारली चित्रकलेची थीम असते.
वारली चित्रकलेबद्दल विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न पुढील प्रमाणे आहे.
प्रश्न) वारली चित्रकला भारत के ---- राज्य की लोक चित्रकला है ?
(SSC CHSL 2023)
A) मणिपूर
B) महाराष्ट्र
C) कर्नाटक
D)मिझोरम
उत्तर : महाराष्ट्र