
चालू घडामोडी 02, नोव्हेंबर 2024 | LiDAR म्हणजे काय ?
![[ What is LiDAR ?, LiDAR Mhanje Kay, 3D model, nakasha, suvey, bhumapan, Light Detection And Ranging, Maya city, Maya sabhyata, reflection, scattered wave, wavelength, paravartan, science notes, vinyan ani tantradnyan notes, Sonar, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/LiDAR_mhanje_kay_1730725518422.webp)
LiDAR म्हणजे काय ?
What is LiDAR ?
अलीकडे, शास्त्रज्ञांनी LiDAR तंत्रज्ञान वापरून, मेक्सिकनच्या घनदाट जंगलात शतकानुशतके हरवलेले माया नावाचे शहर शोधले आहे.
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दिलेल्या पर्यायांपैकी LiDAR बद्दल योग्य माहिती देणारा पर्याय निवडा.
1. LiDAR चे पूर्ण विस्तारीत नाव Light Detection And Ranging असे आहे.
2. LiDAR चा वापर जमिनीच्या पृष्ठभागावरील 3D मॅाडेल तयार करण्यासाठी होतो.
3. 1 आणि 2 दोन्ही योग्य आहेत
4. 1 आणि 2 दोन्ही अयोग्य आहेत
उत्तर : 1 आणि 2 दोन्ही योग्य आहेत
LiDAR तंत्रज्ञानाने हरवलेले माया शहर शोधण्यात कशी मदत केली ?
• शास्त्रज्ञांनी व्हॅलेरियाना नावाचे पूर्वीचे अज्ञात माया शहर शोधण्यासाठी मेक्सिकोच्या कॅम्पेचे प्रदेशातील वन निरीक्षण प्रकल्पातील LiDAR डेटा वापरला.
• शहराच्या वास्तुशास्त्रीय मांडणीवरून असे समजते की ते इसवी सन 150 च्या सुमारास स्थापन झालेले एक प्रमुख राजकीय केंद्र होते.
• शहरामध्ये प्लाझा, मंदिरे आणि जलाशयांचा समावेश आहे, जे पूर्वीच्या माया सभ्यतेच्या राजकीय राजधानीचे वैशिष्ट्य आहे.
• या शोधामुळे माया संस्कृतीचे प्रमाण आणि संरचनेबद्दल अधिक माहिती मिळू शकते.
LiDAR म्हणजे काय ?
• LiDAR चे पूर्ण नाव Light Detection And Ranging असे आहे.
• LiDAR किंवा लाइट डिटेक्शन आणि रेंजिंग, हे रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आहे.
• LiDAR तंत्रज्ञान प्रामुख्याने जमिनीवर आधारित सर्वेक्षण आणि उच्च-रिझोल्यूशन नकाशे तयार करण्यासाठी त्याचप्रमाणे 3D मॅाडेल तयार करण्यासाठी वापरले जाते.
LiDAR काम कसं करतं ?
• LiDAR प्रणालीमध्ये लेसर, स्कॅनर आणि GPS रिसीव्हर असतात.
• ज्या ठिकाणचे अंतर मोजायचे आहे किंवा ज्या ठिकाण शोध घ्यायचा आहे त्या ठिकाणावर लेसर प्रकाश वापरला जातो.
• विमान किंवा हेलिकॉप्टर यांच्याद्वारे जमिनीवर लेसर सोडले जातात.
• जिथे तो वनस्पती, इमारती आणि विविध पृष्ठभागांवरून आदळतो. हा प्रकाश परावर्तित (Reflected) किंवा विखुरलेला (Scattered) असतो आणि LiDAR सेन्सरद्वारे रेकॉर्ड केला जातो.
• परावर्तित बीमची वेळ, इतर डेटासह एकत्रित केल्यावर, ऑब्जेक्टचे तपशीलवार आणि अचूक 3D मॅाडेल तयार करता येते.
LiDAR तंत्रज्ञानाचा वापर कुठे होऊ शकतो ?
• वनीकरण: झाडाची उंची आणि बायोमासचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे शाश्वत वन व्यवस्थापन आणि संवर्धन करण्यात मदत होते.
• पर्यावरणाचे संवर्धन : किनारपट्टीची धूप, नदीचे पात्र, पूर क्षेत्रे आणि इतर नैसर्गिक अधिवासांचे मॅपिंग आणि निरीक्षण करण्यासाठी आणि त्या माहिती द्वारे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी.
• शहरी नियोजन : LiDAR डेटा शहरी लँडस्केपचे तपशीलवार 3D मॉडेल तयार करण्यात मदत करतो, जे पायाभूत सुविधा विकास, झोनिंग आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
• पायाभूत सुविधा प्रकल्प : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पात हवाई LiDAR सर्वेक्षण तंत्राचा पहिल्यांदा वापर केला आहे.