
चालू घडामोडी 04, नोव्हेंबर 2024 | थाडौ समाज कोणत्या राज्यात आहे ?
![[ Who are Thadou tribes ?, Manipur ethnic groups, manipur madhil Adivasi jamati, bhartatil Adivasi jati jamati, Thadou samaj, Thadou jamati, geography population notes, bhugol loksankhya notes, bhartachi loksankhya, Zhum sheti, jhum sheti, tribal agriculture, sthalantarit sheti, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Thadou_Samaj_Kuki_1730725795836.webp)
थाडौ समाज कोणत्या राज्यात आहे ?
Who are Thadou tribes ?
Subject : GS- भूगोल, अर्थशास्त्र - लोकसंख्या
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असणारा थाडौ (Thadou) समाजाबद्दल खालील पैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
A) थाडौ हे प्रामुख्याने राजस्थान राज्यातील स्थानिक लोक आहेत.
B) थाडौ समुदाय प्रामुख्याने झुम प्रकार ची शेती करतात.
पर्याय :
1. फक्त A बरोबर आहे
2. फक्त B बरोबर आहे
3. A आणि B दोन्ही बरोबर आहे
4. A आणि B दोन्ही चूक आहे
उत्तर : फक्त B बरोबर आहे.
- थाडौ हे मणिपूर राज्यातील स्थानिक लोक आहेत.
- त्यामुळे विधान A चुकीचे आहे.
बातमी काय आहे ?
• अलीकडे, आसामच्या गुवाहाटी येथिल आयोजित कार्यक्रमात थाडौ अधिवेशनाच्या आयोजित करण्यात आले होते.
• या कार्यक्रमात मणिपूरमधील थाडौ जमातीची वेगळी ओळख आणि वारसा संरक्षित करण्यासाठी 10-सूत्री घोषणा जारी केली.
थाडौ समाजाबद्दल थोडक्यात माहिती :
• थाडौ हे मणिपूर राज्यातील स्थानिक लोक आहेत.
• मणिपूर राज्यातील इंफाळ खोऱ्याला लागून असलेल्या डोंगराळ प्रदेशात ते राहतात.
• 2011 च्या मणिपूर राज्याच्या जनगणनेनुसार मणिपूरमधील लोकसंख्येच्या बाबतीत थाडौ लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मणिपूरमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या मैतेई या समुदायाची आहे.
• थाडौ समाज उदरनिर्वाहासाठी प्राण्यांचे संगोपन, शेती, शिकार आणि मासेमारी करतात.
• थाडौ वस्ती जंगलात वसलेली आहे ते प्रामुख्याने झुम प्रकार ची शेती करतात.
झूम शेती म्हणजे काय ?
• झूम शेती स्थलांतरित शेतीचा एक प्रकार आहे. यात जंगलातील झाडे- झुडपे तोडून शेतीसाठी योग्य जमिन बनवली जाते.
• जेव्हा जमिनीवरील सर्व वनस्पती तोडून जाळली जाते, तेव्हा राख मृदेत मिसळल्यामुळे पोटॅशचा भरपूर पुरवठा होतो आणि मृदेची सुपीकता वाढते.
• जमिनीची सुपीकता कमी झाल्यावर याच प्रकारे दुसरी जमीन निवडून पुन्हा झाडे- झुडपे तोडून शेती करतात.
• या पद्धतीत शेतीच्या मशागतीसाठी आधुनिक शेती अवजारांचा वापर केला जात नाही.
• झूम शेती प्रामुख्याने भारताच्या ईशान्यकडील भागात केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने आसाम, मणिपूर, मिझोराम, नागालँड इत्यादी राज्यांचा समावेश आहे.