
चालू घडामोडी 06, नोव्हेंबर 2024 | मारखोर काय आहे ?
![[ Markhor Goat, Markhor Sheli, Markhor bakri, Markhor Sheli kothe adhalte, paryavaran notes marathi madhe, environment, IUCN Red List, vanyajiv sanvrakshan kayda, Capra falconeri, bhartatil sanrakshit prani, Wildlife conservation act, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Markhor_1731146591041.webp)
मारखोर काय आहे ?
Markhor Goat
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेली मारखोर शेळी (Markhor Goat) ही खालीलपैकी कोणत्या भागात आढळते ?
1. जम्मू आणि काश्मीर
2. महाराष्ट्र
3. कर्नाटक
4. राजस्थान
उत्तर : जम्मू आणि काश्मीर
बातमी काय आहे ?
• जगातील सर्वात मोठी जंगली शेळी मारखोर जम्मू आणि काश्मीरमध्ये अस्तित्वासाठी लढत आहे.
• तिची लोकसंख्या वाढवण्यासाठी त्याच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
मारखोर बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• मारखोर ही मध्य आणि दक्षिण आशियातील पर्वतीय प्रदेशात आढळणारी वन्य शेळीची प्रजाती आहे.
• मारखोर पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत आणि ताजिकिस्तानच्या काही भागात आढळतात.
• मारखोर ही जगातील सर्वात मोठी जंगली शेळी आहे.
• मारखोर शेळीचे शास्त्रीय नाव काप्रा फाल्कोनेरी (Capra Falconeri) असे आहे.
• मारखोर हा पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी आहे, जिथे त्याला स्क्रू-शिंग असलेला बकरी म्हणूनही ओळखले जाते.
• मारखोर त्यांच्या विशिष्ट नागमोडी आकाराच्या शिंगांसाठी ओळखले जातात.
मारखोर ची संख्या कमी का होत आहेत ?
• मारखोर शेळीची त्यांच्या शिंगांसाठी बेकायदेशीर शिकार केली जाते.
• मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या अधिवास नष्ट होणे.
• अन्नासाठी स्पर्धा या काही प्रमुख कारणांमुळे त्यांची संख्या कमी होत आहे.
मारखोर शेळीचे संवर्धन :
• आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत (IUCN Red List) जवळपास धोक्यात (Near Threatened) या श्रेणींमध्ये मारखोर शेळीची नोंद करण्यात आली आहे.
• मारखोर शेळीची वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 मध्ये अनुसूची १ मध्ये नोंद आहे.