
चालू घडामोडी 08, नोव्हेंबर 2024 | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
![[ PM Vishwakarma Yojana, Pradhanmantri Vishwakarma Yojana, Carpenter, Suthar, Badhai, Boat Maker, Armourer, Goldsmith, Sonar, lohar kumbhar nhavi, Moortikar, 18 pagad jati, government yojna, Sarkari subsidy, MSME loan, collateral free loan, vina Taran karj, udyam registration, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/PM_Vishwakarma_Yojana_1731250181340.webp)
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
PM Vishwakarma Yojana
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
1. 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुरू करण्यात आली.
2. या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुरू करण्यात आली हा पर्याय बरोबर आहे.
ही योजने अंतर्गत लोहार, सोनारकाम, कुंभारकाम, सुतारकाम यांसारख्या क्षेत्रात गुंतलेल्या कारागिरांसाठी प्रशिक्षणस आणि कर्ज देण्यात येते.
बातमी काय आहे ?
• 2023 मध्ये सुरू झालेल्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 20 लाखांहून अधिक अर्जांची यशस्वीपणे नोंदणी झाली आहे.
• देशभरातील पारंपारिक कारागिरांना आधार देण्यात या योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त 'प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना' सुरू केली आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे ?
• ही असंघटित क्षेत्रात गुंतलेल्या कारागिरांसाठीची केंद्र सरकारची योजना आहे.
• लोहार, सोनारकाम, कुंभारकाम, सुतारकाम ही कौशल्ये पुष्कळदा पिढ्यान्पिढ्या एकमेकांना हस्तांतरित केली जातात.
• जुन्या परंपरांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाच्या गुरू-शिष्य मॉडेलचे पालन करतात.
• प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट कारागीरांच्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारणे आणि या वस्तूंना देशात आणि परदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक ती मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
• या योजनेअंतर्गत कारागिरांना मोफत प्रशिक्षण दिले जाते, प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल.
• प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूलकिट खरेदी करण्यासाठी 15000 रुपये दिले जातील
• याशिवाय त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे विना तारण कर्ज दिले जाईल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत कोणकोणत्या व्यवसायांचा समावेश होतो ?
या योजनेअंतर्गत 18 पारंपारिक व्यवसायांचा समावेश आहे.
![[ pm vishwakarma yojana madhe 18 parmparik vyavasayacha samavesh, sutar, dhobi, shimpi, tailor, lohar, sonar, kumbhar, chambhar, nhavi, hair cutting, shilpakar, murtikar, boat kinva naav banavnare, kulup banavnare, mistri, machimaar, toolkit nirmate, dagad foadnare majur, topli, chatai, jhadu banavnare, bahuli anni itar paramparik khelni utpadak, fool haar banavnare ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/18_Occupations_1731313718572.webp)
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता काय आहे ?
• लाभार्थीचे किमान वय १८ वर्षे असावे.
• लाभार्थी संबंधित व्यापारात गुंतलेला असावा.
• केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या समान क्रेडिट-आधारित योजनांतर्गत कर्ज घेतलेले नसावे.