
चालू घडामोडी 09, नोव्हेंबर 2024 | महाकुंभ मेळा 2025 | प्रयागराज
![[ Maha Kumbh Mela, Kumbh Mela 2025, Haridwar, Ujjain, Nashik, Prayagraj, Kumbh Mela kiti varshani yeto, 2025 cha kumbhamela kuthe hoil, UNESCO World Heritage site, pilgrims, Yatra, tirthshetra, tirthshetra anghol, pilgrims who bathe in sacred rivers, kala ani sanskruti, bhartacha Itihas, bhartatil Pavitra tirthshetra, tirthsthal, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Mahakumbh_Mela_2025_1731420506816.webp)
महाकुंभ मेळा 2025
Maha Kumbh Mela 2025
Subject : GS - इतिहास- कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जात नाही ?
1. हरिद्वार
2. उज्जैन
3. नाशिक
4. वाराणसी
उत्तर : वाराणसी
बातमी काय आहे ?
13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रयागराज या पवित्र शहरात महाकुंभ मेळा भरणार आहे.
• कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.
• ज्यामध्ये करोडो भाविक कुंभोत्सवात जमतात आणि नदीत स्नान करतात.
• खगोलशास्त्रीय गणनेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य आणि चंद्र वृश्चिक राशीत आणि गुरु मेष राशीत प्रवेश करतात तेव्हा हा पवित्र उत्सव सुरू होतो.
• हा काळ आध्यात्मिक शुद्धी आणि आत्म-ज्ञानासाठी शुभ काळ मानला जातो.
कुंभमेळा कोण- कोणत्या ठिकाणी भरतो ?
• कुंभमेळा 12 वर्षांच्या कालावधीत 4 वेळा साजरा केला जातो.
• दर 3 वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात.
• दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो.
• बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.
कुंभमेळा तीर्थक्षेत्र आणि पवित्र नद्या :
1. उत्तराखंडमध्ये, हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठावर
2. उत्तर प्रदेशमध्ये,प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यां नद्यांच्या संगमावर
3. मध्य प्रदेशातील, उज्जैन येथे शिप्रा नदीच्या काठावर
4. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर/नाशिक येथे, गोदावरी नदीच्या काठावर
कुंभमेळा ची युनेस्कोच्या मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केव्हा नोंद करण्यात आली ?
• UNESCO द्वारे 2017 मध्ये मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून कुंभमेळा ची नोंद करण्यात आली.
• कुंभमेळा आधुनिकीकरणाच्या युगात प्राचीन परंपरांचे अस्तित्व आणि उत्क्रांतीचा पुरावा म्हणून म्हणून ओळखला गेला.