
चालू घडामोडी 08, नोव्हेंबर 2024 | गुरुत्वाकर्षण ऊर्जा साठवणूक म्हणजे काय ? | What is Gravity Energy Storage?
![[ What is Gravity energy storage?, Gurutvakarshan, Gurutvakarshan urja sathvnuk, Gurutvakarshan urjasanchayan mhanje Kay, Solar energy, wind energy, saururja, pavanurja, Vij nirmiti Kashi hote, light, renewable energy, akshay urja, green energy, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Gravity_Energy_Storage_2_1731244206994.webp)
गुरुत्वाकर्षण ऊर्जा साठवणूक म्हणजे काय ?
What is Gravity Energy Storage?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऊर्जा
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) गुरुत्वाकर्षण ऊर्जा साठवणूक याबद्दल योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) सूर्यप्रकाश किंवा वाऱ्याअभावी कमी वीज निर्माण होते त्यावेळेस ही साठवलेली वीज वापरता येते.
ब) यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल.
क) हा जास्त मेंटेनन्स, कमी वर्ष वीज स्टोर करू शकणारा उपाय आहे.
पर्याय :
1. फक्त अ आणि ब बरोबर
2. फक्त अ आणि क बरोबर
3. फक्त ब आणि क बरोबर
4. अ, ब आणि क बरोबर
उत्तर : फक्त अ आणि ब बरोबर
विधान क) चुकीचे आहे.
हा कमी मेंटेनन्स, जास्त वर्ष वीज स्टोर करू शकणारा उपाय आहे.
बातमी काय आहे ?
• गुरुत्वाकर्षण ऊर्जा संचयन किंवा साठवणूक हे सौर आणि पवन ऊर्जेच्या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी एक व्यवहार्य उपाय म्हणून उदयास येत आहे.
• हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे गुरुत्वाकर्षण वापरून ऊर्जा साठवते.
• अक्षय ऊर्जा साठवण्यासाठी गुरुत्वाकर्षणाचा उपयोग या नवीन तंत्रज्ञानद्वारे करता येईल.
गुरुत्वाकर्षण ऊर्जा संचयन काम कसं करतं ?
• स्थितिज ऊर्जेमध्ये रूपांतर : ज्या वेळेस पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जा वापरून गरजेपेक्षा जास्त वीज निर्मिती होते त्यावेळेस ही जास्त तयार झालेली वीज जड वस्तुमान जसे की पाणी, काँक्रीट ब्लॉक्स उचलून त्यांमध्ये साठवली जाते.
• विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर : जेव्हा वीजेची मागणी जास्त असते त्यावेळेस जड वस्तुमान जसे की पाणी, काँक्रीट ब्लॉक्स खाली सोडून त्याद्वारे टर्बाइन फिरवले जाते आणि साठवलेली ऊर्जा पुन्हा वापरासाठी उपलब्ध केली जाते.
गुरुत्वाकर्षण ऊर्जा संचयनाचा फायदा कसा होईल ?
• ज्या वेळेस सूर्यप्रकाश किंवा वाऱ्याअभावी कमी वीज निर्माण होते त्यावेळेस ही स्टोर (साठवलेली) वीज वापरता येईल.
• सध्या ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरींचा वापर केला जातो.
• बॅटरी स्टोरेजला नियमित देखभालीची आवश्यकता असते, तसेच हे कमी आयुर्मान, आणि उत्पादन आणि विल्हेवाट यापासून पर्यावरणाची हानी यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो.
• याउलट गुरुत्वाकर्षण ऊर्जा स्टोरेज हा कमी मेंटेनन्स, जास्त वर्ष वीज स्टोर करू शकणारा उपाय देते.
• गुरुत्वाकर्षण संचय हानिकारक रासायनिक अभिक्रिया टाळते, पर्यावरणीय प्रभाव आणि विल्हेवाट समस्या कमी करते.
स्थितिज ऊर्जा (Potential Energy) म्हणजे काय ?
• आकारामुळे किंवा संरुपणामुळे त्या वस्तूमध्ये जी ऊर्जा सामावलेली असते, तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात.
• स्थितिज ऊर्जा ही गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा, विद्युत स्थितिज ऊर्जा यांसारख्या विविध स्वरूपांत असते व तिचे गतिज ऊर्जेत रूपांतर झाल्याखेरीज कार्य होत नाही.
गतिज ऊर्जा (Kinetic energy) म्हणजे काय ?
गतिमान अवस्थेमुळे वस्तूस प्राप्त झालेल्या उर्जेला, गतिज ऊर्जा असे म्हणतात.