
चालू घडामोडी 11, नोव्हेंबर 2024 | जागतिक विज्ञान दिवस | World Science Day
![[ UNESCO, United Nations Educational, Scientific and Cultural Organization, sanyukt rashtra sanghatna, World Science Day, jagtik vinyan din, jagtik vinyan divas, National science day, jagtik vinyan divasachi sankalpana, World Science Day theme, Youth at the forefront, vinyan notes, vinyan notes marathi madhe, MPSC science notes marathi madhe, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/World_Science_Day_1731476861244.webp)
जागतिक विज्ञान दिवस
World Science Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक विज्ञान दिन खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1. 1 नोव्हेंबर
2. 5 नोव्हेंबर
3. 10 नोव्हेंबर
4. 21 नोव्हेंबर
उत्तर : 10 नोव्हेंबर
• दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.
• 2001 मध्ये UNESCO ने जागतिक विज्ञान दिनाची स्थापन केली.
• हा दिवस, जागतिक शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी विज्ञानाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी समर्पित आहे.
• दरवर्षी, हा दिवस हवामान बदल, आरोग्य संकटे आणि जैवविविधतेची हानी यासारख्या महत्त्वाच्या जागतिक आव्हानांचे निराकरण करण्यात विज्ञानाच्या आवश्यक भूमिकेकडे लक्ष वेधतो.
(नोट - UNESCO : United Nations Educational, Scientific and Cultural Organization.
UNESCO ही संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था आहे.)
पहिला जागतिक विज्ञान दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
UNESCO च्या संयुक्त विद्यमाने 10 नोव्हेंबर 2002 रोजी जगभरात शांतता आणि विकासासाठी पहिला जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
जागतिक विज्ञान दिवस साजरा करण्याचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे ?
जागतिक विज्ञान दिवस का साजरा करण्यात येतो ?
• विज्ञानाचा शांतता आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणे.
• विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची देवाणघेवाण करणे.
• राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.
• येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधणे.
• सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी व विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक विज्ञान दिवस 2024 ची संकल्पना थीम काय आहे ? त्या संकल्पनेचा अर्थ काय आहे ?
• 2024 साठी, "तरुणांचा पुढाकार" (Youth at the forefront) ही जागतिक विज्ञान दिवसाची संकल्पना (थीम) आहे.
• शाश्वत विकासासाठी नुकत्याच घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान दशकाच्या (२०२४-२०३३) अनुसरून यंदाची ही संकल्पना (थीम) आहे.
• ही थीम तरुणांना आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल जगात विज्ञानाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करते.
• विज्ञानाचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो आणि पर्यावरणीय स्थिरता आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिकांशी संवाद साधण्यासाठी युवकांना आमंत्रित करते.
भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.