
चालू घडामोडी 12, नोव्हेंबर 2024 | भारताचे 51 वे सरन्यायाधीश | 51st Chief Justice of India
![[ Justice Sanjiv Khanna, President, CJI Sanjiv Khanna, 51st Chief Justice of India, supreme court, sarvochh nyayalay, sarnyayadhish, bhartache sarnyayadhish, Sanjiv Khanna yanche Nikal, article 370, electoral bond, EVM machine, Arvind Kejriwal, Loksabha election, Appointment of CJI, Who appointed Chief Justice of India, bhartache sarnyayadhishanchi niyukti, Qualifications to appoint Chief Justice of India, what Qualification required person to be appointed as a Supreme Court judge, bhartacha nyadhish mhanun nemnuk pattrata, Indian citizen, Bhartiya nagrik, vakil, judge, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Bhartache-51-ve-sarnyadish_1731683300476.webp)
भारताचे 51 वे सरन्यायाधीश
51st Chief Justice of India
Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र- सर्वोच्च न्यायालय
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून खालील पैकी कोणी शपथ घेतली ?
1. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड
2. न्यायमूर्ती विक्रम नाथ
3. न्यायमूर्ती संजीव खन्ना
4. न्यायमूर्ती भूषण गवई
उत्तर : न्यायमूर्ती संजीव खन्ना
बातमी काय आहे ?
• न्यायाधीश संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
• राष्ट्रपती भवनात संजीव खन्ना यांच्या सरन्यायाधीश पदाचा शपथविधी पार पडला.
• यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.
• भारताचे नवे सरन्यायधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत असणार आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे महत्त्वाचे निर्णय कोणते ?
नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या निर्णयाचे ते भाग होते.
उदाहरणार्थ :
• संविधानातील कलम 370 रद्द करणे
• इलेक्टोरल बाँड्स योजना रद्द करणे
• दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करणे
• अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अल्पसंख्याक दर्जा निर्धारण प्रकरणात नुकत्याच झालेल्या बहुमताच्या निर्णयाचाही ते भाग होते.
• लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी VVPAT आणि EVM यांच्यातील मतांची 100 टक्के जुळवाजुळव करण्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात ?
• सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती संविधानाच्या कलम 124(2) अंतर्गत राष्ट्रपतींद्वारे केली जाते.
• न्यायाधीश आपले पद वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात
• नियमानुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ (ज्येष्ठतम) न्यायाधीशांना भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून नियुक्त केले जाते.
1993 चा द्वितीय न्यायाधीश खटला काय सांगतो ?
दुसऱ्या न्यायाधीशांच्या खटल्यात (1993), सर्वोच्च न्यायालयाने, " भारताच्या सरन्यायाधीश पदावर केवळ जेष्ठतम न्यायाधीशाची नेमणूक करण्यात यावी " असा निकाल दिला.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्रता काय असावी लागते ?
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे :
• ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी आणि
• त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा किंवा
• त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्षे वकील म्हणून काम करण्याचा अनुभव असावा किंवा
• राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी.
सरन्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे ?
न्यायाधीशांना पदावरून काढण्याची पद्धत काय आहे ?
• राज्यघटनेतील कलम 124(4) मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे
• राष्ट्रपती सरन्यायाधीशांना पदावरून दूर करू शकतात.
• संसदेने सरन्यायाधीशांना (न्यायाधीशांना) पदावरून हटवण्याबाबत अभिभाषण सादर केल्यानंतरच राष्ट्रपती असे करू शकतात.
• संसदेत हे समावेदन प्रत्येक सभागृहाच्या विशेष बहुमताने संमत होणे गरजेचे असते.
• प्रत्येक सभागृहाच्या विशेष बहुमत म्हणजेच :
• त्या सभागृहाच्या (लोकसभा किंवा राज्यसभा) एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि
• कमीत कमी हजर व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश इतक्या बहुमताने संमत होणे गरजेचे असते.
• न्यायाधीशांना गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता या आधारांवर पदावरून दूर करता येऊ शकते.
भारताच्या सरन्यायाधीशांची मुख्य भूमिका/ अधिकार काय असतात ?
Key Role of Chief Justice of India
• सरन्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ देतात.
• "मास्टर ऑफ द रोस्टर" (Master of Roster) : सरन्यायाधीशांकडे विशिष्ट खटले (केस) विशिष्ट खंडपीठांना सोपवण्याचा आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार आहे.
• सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीश (सर्वोच्च न्यायालयाच्या 4 सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांच्या कॉलेजियमसह) राष्ट्रपतींना सल्ला देतात.
• घटनेच्या कलम 127 अंतर्गत भारताचे सरन्यायाधीश एखाद्या न्यायाधीशास तात्पुरत्या काळासाठी सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीश (Ad-hoc Judges) म्हणून नेमू शकतात.