सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य
First State in the Country to implement Semiconductor Policy
Subject : GS - सरकारी योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) समर्पित अर्धवाहक (सेमीकंडक्टर) धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. कर्नाटक
4. उत्तर प्रदेश
उत्तर : गुजरात
बातमी काय आहे ?
गुजरात सरकारने सेमीकंडक्टर उत्पादनात गुजरातला आघाडीवर ठेवण्यासाठी गुजरात सेमीकंडक्टर धोरण 2022-2027 सादर केले आहे.
गुजरात सेमीकंडक्टर धोरण 2022-2027 (Gujarat Semiconductor Policy 2022-2027) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• गुजरात सरकारने भारतातील पहिले ‘गुजरात सेमीकंडक्टर धोरण 2022-2027’ सादर केले आहे.
• समर्पित सेमीकंडक्टर धोरणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे भारतातील पहिले राज्य बनले आहे.
• गुजरातमध्ये चार प्रमुख कंपन्यांकडून 1.24 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
• गुजरात राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मते, या प्रकल्पांमुळे अंदाजे 53,000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
• धोलेरा येथिल ‘सेमीकॉन सिटी’मध्ये, टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) आणि तैवानचे पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC) 91,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह भारतातील पहिली AI-सक्षम सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा स्थापन करत आहेत.
• धोलेरा हे ठिकाण, भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले जात आहे.
अर्धवाहक (सेमी कंडक्टर) म्हणजे काय ?
What is Semiconductor ?
• घन पदार्थांच्या गुणधर्मात विद्युतवाहकता किंवा विद्युत रोधकता असे गुण असतात.
• शक्यतो धातू- तांबे, लोखंड, अल्युमिनियम इत्यादी हे विद्युत वाहक (Conductors) असतात.
• तर अधातू - लाकूड, काच, प्लास्टिक, रबर इत्यादी हे विद्युत रोधक (Insulators) असतात.
• सेमी कंडक्टर - या व्यतिरिक्त असे काही पदार्थ असतात जे कधी कधी विद्युत वाहक म्हणून काम करतात तर कधी विद्युत रोधक म्हणून काम करतात यानांच अर्धवाहक (Semiconductor) म्हणतात.
• सेमी कंडक्टर या घन पदार्थांची विद्युतवाहकता ही कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्या मध्ये असते. यामध्ये प्रामुख्याने सिलिकॉन (Si) आणि जर्मेनिअम (Ge) हे पदार्थ येतात.
सेमीकंडक्टर एवढे महत्त्वाचे का आहे ?
• डायोड, ट्रान्झिस्टर आणि इंटिग्रेटेड सर्किट्ससह विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीमध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो.
• अशी उपकरणे त्यांच्या आकारमानाने छोटे (कॉम्पॅक्टनेस), विश्वासार्हता, उर्जा कार्यक्षमता आणि कमी किमतीमुळे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
• सेमीकंडक्टर चिप अनेक हायटेक उपकरणांमध्ये बसवली जाते.
• डेटाची प्रक्रिया सेमीकंडक्टर चिपद्वारेच केली जाते. यामुळेच याला इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा मेंदू देखील म्हणतात.
सेमीकंडक्टर चिप चा वापर कोठे केला जातो ?
• वैद्यकीय उपकरणे, मोटारगाड्या, लढाऊ विमाने, स्मार्ट फोन, जगभरातील लक्झरी वाहने, विमाने, सुपरफास्ट ट्रेन्स, अंतराळ उपकरणे, रॉकेट, उपग्रह, सुपर कॉम्प्युटर, यांपासून ते नवीन तंत्रज्ञान जसे की क्लाउड कॉम्प्युटिंग, उच्च वायरलेस नेटवर्क्स, क्वांटम कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन ऍप्लिकेशन्स, बिटकॉइन मायनिंग, 5G, सेल्फ-ड्रायव्हिंग व्हेइकल्स, रोबोट्स, ड्रोन, गेमिंग, यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानात सेमीकंडक्टर वापरले जाते.
जगातील प्रमुख सेमीकंडक्टर उत्पादक देश कोणते ?
• तैवान, दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका आणि नेदरलँड हे त्याचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश आहेत.
• तैवानची TSMS ही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी आहे.
इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) काय आहे ?
What is the India Semiconductor Mission ?
• इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2021 मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत सुरू करण्यात आला.
• हा देशातील शाश्वत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले इकोसिस्टमच्या विकासासाठी व्यापक कार्यक्रमाचा एक भाग आहे.
• भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी एकूण 76,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
• सेमीकंडक्टर्स, डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझाइन इकोसिस्टममध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.