
चालू घडामोडी 14, नोव्हेंबर 2024 | क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे | Krantiguru Lahuji Salve
![[ Krantiguru Lahuji Salve, Lahuji vastad Salve, maharashtratil krantikarak, maharashtracha Itihas, maharashtratil samajsudharak, Vasudev balvant phadke, vastad Salve, sangamvadi samadhi stal, purandar taluka, purandar Killa, Pune jilha, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Lahuji-Salve-Banner_1732173124806.webp)
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे | Krantiguru Lahuji Salve
क्रांतिकारकांचे क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मनोभावाने मानवंदना करून जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास
Subject : GS - महाराष्ट्राचा इतिहास, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला ?
1. मुंबई
2. पुणे
3. रत्नागिरी
4. नाशिक
उत्तर : पुणे
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांबद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुण्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी झाला.
• लहुजी हे राघोजी साळवे आणि विठाबाई साळवे यांचे पुत्र होते.
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज काम करत; त्यांच्या कामगिरीमुळे छत्रपतींनी लहुजींच्या पूर्वजांना राऊत ही पदवी बहाल केली.
• पूर्वजांप्रमाने लहुजीही युद्धकलेत निपुण होते.
• दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये क्रांतिगुरू लहुजी साळवे निपुण होते.
• देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांची सेना त्यांनी निर्माण केली.
• त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजाचे युवक तालीम घेत होते.
• लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू यांसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या तालमीत तयार झाले.
• राष्ट्रभक्तीचे ज्वलंत प्रतीक क्रांतीगुरू लहुजी साळवे यांनी तरुणांना संघटन कसे करावे, समाजकार्यात व राष्ट्रकार्यात स्वतःला वाहून कसे घ्यावे याची बोध दिले.
• त्यांच्या या शिकवणीतून अनेक क्रांतिकारकांनी तसेच समाजकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले मोलाचे योगदान दिले.
• 17 फेब्रुवारी 1881 रोजी पुण्याच्या संगमवाडी या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मावळली.
• आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची समाधी संगमवाडी, पुणे येथे आहे.