
चालू घडामोडी 16, नोव्हेंबर 2024 | जगातील पहिल्या कार्बन डायऑक्साइड ते मिथेनॉल रूपांतरण संयंत्र | World’s First CO₂ to Methanol Plant
![[ World’s First CO₂ to Methanol Plant, Methanol as a fuel, Methanol indhan, Methanol blending, Methanol mishran, Methanol rasaynik sutra, Methanol, What are the benefits of carbon dioxide to methanol conversion ? , How is carbon dioxide converted to methanol?, benefits of methanol fuel, National Thermal Power Corporation Limited , NTPC job, NTPC exam, NTPC results, NTPC cutoff, NTPC vacancy, NTPC headquarters, NTPC mukhyalay, bhartacha maharatna company kontya, CH₃OH, methanol Che rasaynik sutra , methanol Che gundharma, Key Properties, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/World-Largest-Plant-Carbon-dioxide-Methanol_1732365375349.webp)
जगातील पहिल्या कार्बन डायऑक्साइड ते मिथेनॉल रूपांतरण संयंत्र
World’s First CO₂ to Methanol Plant
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतेच जगातील पहिल्या कार्बन डायऑक्साइड ते मिथेनॉल रूपांतरण संयंत्राचे उद्घाटन करण्यात आले. ते खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1. महाराष्ट्र
2. आंध्र प्रदेश
3. उत्तर प्रदेश
4. मध्य प्रदेश
उत्तर : मध्य प्रदेश
बातमी काय आहे ?
NTPC, या भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनीने, तिच्या 50 व्या स्थापना दिनानिमित्त मध्य प्रदेश येथील त्यांच्या विंध्याचल फॅसिलिटी येथे जगातील पहिल्या कार्बन डायऑक्साइड ते मिथेनॉल रूपांतरण संयंत्राचे उद्घाटन केले.
कार्बन डायऑक्साइड ते मिथेनॉल रूपांतरण म्हणजे नेमकं काय ?
CO2 to (CH₃OH) Conversion
• या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजनचा वापर करून मिथेनॉल (CH₃OH) इंधन बनवले जाते.
• हा कार्बन व्यवस्थापन आणि शाश्वत इंधन उत्पादनातील ऐतिहासिक टप्पा आहे.
कार्बन डायऑक्साइड ते मिथेनॉल रूपांतरण कसं करतात ?
How is Carbon dioxide converted to Methanol ?
• CO₂ कॅप्चर : वीज प्रकल्प यांसारख्या पॉवर प्लांटमधून सोडले जाणारे फ्ल्यू गॅसमधून किंवा थेट वातावरणातून कार्बन डायऑक्साइड (CO₂) घेतला (कॅप्चर) केला जातो.
• हायड्रोजन उत्पादन : सौर किंवा पवन उर्जा सारख्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिसद्वारे हायड्रोजन तयार केला जातो.
• मिथेनॉल संश्लेषण : कॅप्चर केलेले कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजनपासून उत्प्रेरकाच्या उपस्थितीत मिथेनॉल तयार केला जातो.
• ही प्रक्रिया सामान्यत: उच्च दाब आणि तापमानात होते.
![[ batami kay ahe, carbon-di-oxide-te-methanol-rupantaran-mhanje-nemka-kay, Carbon-di-oxide te methanol rupantaran kasa kartat, CO2-capture, Hydrogen-utpadan, methanol-sansleshan, nutnikaranyogya indhan strot, renewable fuel source, urja sathavnuk anni vahatuk, efficient energy storage and transport, haritgruh vayu utsarjanaat ghat, reduction in greenhouse gas emmissions, methanol-mhanje-kay, methanol-che-gundharma-konte, NTPC-National-Thermal-Power-Corporation-Limited, NTPC-che-mukhyalay-navi-delhi, sthapna-1975 ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/World-Largest-Plant-Carbon-dioxide-Methanol-Process_1732363628204.webp)
कार्बन डायऑक्साइड-ते-मिथेनॉल रूपांतरणाचे फायदे काय आहेत ?
What are the benefits of Carbon dioxide to Methanol conversion ?
नूतनीकरणयोग्य इंधन स्त्रोत (Renewable Fuel Source) :
मिथेनॉलचा वापर वाहतूक, वीज निर्मिती किंवा रसायनांसाठी कच्चा माल किंवा इंधन म्हणून केला जाऊ शकतो.
ऊर्जा साठवणूक आणि वाहतूक (Efficient Energy Storage and Transport) :
मिथेनॉल हे कमी ज्वलनशील असल्यामुळे हायड्रोजनपेक्षा मिथेनॉल साठवणे आणि मिथेनॉलची वाहतूक करणे सोपे आहे.
मिथेनॉलचा वापर इंधन म्हणून करता येईल.
हरितगृह वायू उत्सर्जनात घट (Reduction in Greenhouse Gas Emissions) :
• पॉवर प्लांटमधून सोडलेला कार्बन डायऑक्साइड वापरल्यामुळे वातावरणावरील तापमान वाढ ( Global warming) कमी करण्यासाठी मदत होईल.
• इंधनामध्ये मिथेनॉल मिश्रणामुळे पारंपारिक इंधनाच्या तुलनेत हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते.
मिथेनॉल म्हणजे काय ?
• मिथेनॉल (CH₃OH), ज्याला अनेकदा मिथाइल अल्कोहोल किंवा वुड अल्कोहोल असेही म्हणतात.
• हे सर्वात सरळ अल्कोहोल आहे.
• मिथेनॉलचे रासायनिक सूत्र CH₃OH हे आहे.
मिथेनॉल चे मुख्य गुणधर्म कोणते ?
• मिथेनॉल हे रंगहीन आहे.
• मिथेनॉल पाण्यात पूर्णपणे विरघळते.
• मिथेनॉल हे अत्यंत ज्वलनशील आहे, त्याची काळजीपूर्वक हाताळणी आणि साठवण आवश्यक आहे.
• मिथेनॉलचे सेवन केल्यास मानव आणि प्राण्यांसाठी ते विषारी आहे.
( नोट : परीक्षेत रासायनिक सूत्र विचारतात )
NTPC बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• NTPC म्हणजे National Thermal Power Corporation Limited
• NTPC ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे.
• भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी आहे.
• NTPC ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत महारत्न श्रेणीचे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (Central Public Sector Undertaking ) आहे.
• भारतीय राज्य विद्युत मंडळांसाठी वीज निर्मिती आणि वितरण करणे हे NTPC चे मुख्य कार्य आहे.
• NTPC चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
• NTPC कंपनीची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली.