
चालू घडामोडी 15, नोव्हेंबर 2024 | CISF ची पहिली महिला बटालियन
![[ Central Industrial Security Force, kendriya audyogik Suraksha Bal, kendriya audyogik Suraksha Balache mahasanchalak, Nina Singh, Rajwinder Singh Bhatti, z plus Suraksha, vip Suraksha, cisf sthapna din, cisf sthapna divas, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/CISF-MAHILA-BATTALION_1732201443304.webp)
CISF ची पहिली महिला बटालियन
First All-Women Battalion of CISF
बातमी काय आहे ?
• गृह मंत्रालयाने CISF च्या पहिल्या सर्व महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिली आहे.
• ही पहिली बटालियन असेल, ज्यामध्ये फक्त महिला असतील.
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल स्थापना दिन केव्हा साजरी केला जातो ? (SSC GD)
1) 12 जुलै
2) 10 जून
3) 10 मार्च
4) 12 एप्रिल
उत्तर: 10 मार्च
प्रथम महिला CISF बटालियन बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• फक्त महिला कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेली ही पहिली CISF बटालियन असेल.
• क्षमता : यामध्ये 1,000 पेक्षा जास्त महिला कर्मचारींचा समावेश असेल.
• VIP सुरक्षा, विमानतळांची सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांवरील वाढत्या मागण्यांना प्रतिसाद म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
• या बटालियनच्या स्थापनेमुळे अधिकाधिक तरुणींना CISF मध्ये सामील होण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळेल.
• महिलांचे सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये महिलांची भूमिका वाढवण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय आहे.
• सध्या एकूण CISF मनुष्यबळाच्या 7% पेक्षा जास्त महिला आहेत.
CISF ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायदा,1968 अंतर्गत 10 मार्च 1969 रोजी CISF ची स्थापना करण्यात आली.
• CISF अंतर्गत, 12 रिझर्व बटालियन आणि 8 प्रशिक्षण संस्था आहे.
CISF च काम काय असतं ?
• विमानतळ, दिल्ली मेट्रो, अंतराळ विभाग, अणुऊर्जा प्रकल्प, बंदरे, ऐतिहासिक वास्तू, वीज, कोळसा, हॉस्पिटल आणि खाणकाम क्षेत्र तसेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा क्षेत्रांना सुरक्षा पुरविणे.
• CISF देशाच्या राजधानीतील महत्त्वाच्या सरकारी इमारती त्याचबरोबर खाजगी विभागातील क्षेत्रांनाही सुरक्षा पुरवितात.
• CISF विशेष व्यक्तींना देण्यात येणारी झेड प्लस, झेड, एक्स, वाय ( Z Plus, Z, X, Y) श्रेणीतील सुरक्षा व्यवस्था प्रदान करते.
• CISF हे एकमेव असे दल आहे की ज्याकडे स्वतःचे समर्पित अग्निशमन शाखा (फायर विंग ) आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सध्याचे महासंचालक कोण आहेत ?
• राजविंदर सिंग भाटी (Rajwinder Singh Bhatti) हे CISF चे वर्तमान महासंचालक आहेत.
• त्यांनी सप्टेंबर 2024 मध्ये CISF चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.
![[ Rajvinder-Singh-Batti, CISF-che-vartaman-mahasanchalak, september-2024, CISF ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/CISF-RAJVINDER-SINGH-BHATTI_1732200310668.webp)
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण होत्या ?
नीना सिंह (Nina Singh) या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला महासंचालक होत्या.