
चालू घडामोडी 19, नोव्हेंबर 2024 | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळल्याने केंद्र सरकारने केला ‘AFSPA’ लागू
![[ AFSPA Mhanje kay, AFSPA Kay ahe, sashastra dal Vishesh Adhikar Kayda, AFSPA kothe lagu kela, defence, sanrakshan, article 355, Kalam 355 Kay ahe, Kendra sarkar, gruhmantri, gruhmantralay, Disturbed area mhanje Kay, manipur Disturbed area, manipur AFSPA, Bhartiya rajyaghatna, sanvidhan, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Manipur-madhe-AFSPA_1732527427727.webp)
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळल्याने केंद्र सरकारने केला ‘AFSPA’ लागू
AFSPA REIMPOSED IN SOME AREAS OF MANIPUR
बातमी काय आहे ?
• मागील वर्षी सुरक्षेच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा दर्शवून मणिपूरमधून AFSPA हा कायदा पूर्णपणे मागे घेण्यात आला होता.
• परंतु मणिपूर नुकताच हिंसाचारा उफाळल्याने तेथील काही भागात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्या (AFSPA) पुन्हा लागू करण्यात आला आहे.
Subject : GS - राज्यशास्त्र, कायदा व सुव्यवस्था, सशस्त्र दल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्या (AFSPA) अंतर्गत खालील पैकी कोणते विशेष अधिकार दिले गेले आहे ?
1. वॉरंटशिवाय अटक करण्याचा तसंच एखाद्या परिसरात घुसून झडती घेण्याचा अधिकार
2. पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना न जमू देण्याचा अधिकार
3. जीव जाण्याइतपत गोळीबार किंवा बळाचा वापर करण्याचा अधिकार
4. वरील सर्व
उत्तर : वरील सर्व
सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA - Armed Forces Special Powers Act) म्हणजे काय ?
• भारताच्या संसदेने 1958 मध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) संमत केला.
• सशस्त्र दलांना अशांत क्षेत्रात (Disturbed Areas) सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्यदलांना विशेष अधिकार हा कायदा देतो.
• घटनेच्या कलम 355 मध्ये “बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे हे संघराज्याचे (केंद्र सरकारचे) कर्तव्य असेल." असे सांगितले आहे.
AFSPA (आफस्पा) कधी लागू केला जातो ?
कायद्याच्या कलम 2 अंतर्गत एखादे क्षेत्र ’अशांत क्षेत्र' घोषित केल्यानंतरच हा कायदा लागू केला जाऊ शकतो.
अशांत क्षेत्र (Disturbed Area) म्हणजे काय ?
विविध धार्मिक, वांशिक, भाषा किंवा प्रादेशिक गट किंवा जाती किंवा समुदाय यांच्यातील मतभेद किंवा विवादांमुळे एखादे क्षेत्र अशांत क्षेत्र (Disturbed area) झाले आहे असे मानले जाऊ शकते.
एखादे क्षेत्र अशांत क्षेत्र (Disturbed area) म्हणून कोण घोषित करतात ?
केंद्र सरकार, किंवा राज्याचे राज्यपाल किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा संपूर्ण किंवा काही भाग अशांत क्षेत्र म्हणून घोषित करू शकतात.
अशांत क्षेत्रात लष्कराचे विशेष अधिकार कोणते ?
1. वॉरंटशिवाय अटक करण्याचा तसंच एखाद्या परिसरात घुसून झडती घेण्याचा अधिकार
2. पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना न जमू देण्याचा अधिकार
3. जीव जाण्याइतपत गोळीबार किंवा बळाचा वापर करण्याचा अधिकार
4. अटक केलेल्या व्यक्तीला पोलिसांकडे देणे - सर्वसाधारणपणे पोलीस यंत्रणा अटक करते. पण AFSPA मुळे लष्कराला संशयितांना अटक करण्याचा अधिकार मिळतो आणि 'कमीत कमी उशीर करून' त्यांना पोलिसांकडे हजर करण्याच्या सूचना हा कायदा देतो.
5. कायदेशीर कारवाईपासून संरक्षण- या कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून केलेल्या कारवाईसाठी कोणत्याही प्रकारची चौकशी, खटला किंवा कायदेशीर कारवाई केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय करता येणार नाही अशीही तरतूद या कायद्यात आहे.
![[ ashant shetrat lashkarache vishesh adhikar, warrant shivay atak, paanch kiva paachpeksha adhik lokana n jamu denyacha adhikaar, balacha vaapar karnyacha adhikaar, atak kelelya vyaktila polisankade sopavne, kaydeshir karvaipasun sanrakshan ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Manipur-AFSPA-Lashkarche-vishesh-adhikaar_1732526324315.webp)