
चालू घडामोडी 18, नोव्हेंबर 2024 | माओरी समुदाय आणि हाका नृत्य काय आहे ?
![[ New Zealand, Maori Group, Haka dance,Maori culture, Ta Moko, Polynesian peoples, Polynesia trikon, Polynesian countries, Polynesian triangle, war dance, Treaty of Waitangi, geography notes, places in news, map, location, nakasha, New Zealand parliament, New Zealand sansad, oshania Khand, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Maori-Community-MP-Haka-Dance-Parliament_1732455163035.webp)
माओरी समुदाय आणि हाका नृत्य काय आहे ?
What is the Maori Community and the Haka Dance?
Subject : GS - भूगोल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेल्या कोणत्या देशाच्या खासदारांनी विधेयकाला विरोध नोंदवण्यासाठी संसदेत माओरी समुदायाचे पारंपरिक 'हाका' नृत्य ' सादर केले.
1. भारत
2. अमेरिका
3. न्यूझीलंड
4. जपान
उत्तर : न्यूझीलंड (New Zealand)
बातमी काय आहे ?
• न्यूझीलंडच्या माओरी समुदायाच्या खासदार हाना-रावती मापेई-क्लार्क यांनी संसदेत करार तत्त्वे विधेयकाला आपला विरोध नोंदवण्यासाठी माओरी समुदायाचे पारंपरिक 'हाका' नृत्य ' सादर करत या विधेयकाची प्रत भर संसदेत फाडली.
• या विधेयकाचा उद्देश वेटांगी कराराची पुनर्व्याख्या करणे हा आहे.
• त्याला विरोध म्हणून न्यूझीलंडच्या संसदेत 'हाका' नृत्य ' करण्यात आले.
• त्याचबरोबर न्यूझीलंड देशातील नागरिक या विधेयकाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले.
माओरी समुदाय कोण आहेत ?
• माओरी ही न्यूझीलंडची एक स्थानिक जमात आहे जी न्यूझीलंडमध्ये शतकानुशतके वास्तव्य करत आहेत, त्यांची मुळे देशाच्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत.
• माओरी हे पॉलिनेशियन समुदाय आहेत.
• 2013 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडमध्ये 5,98,605 माओरी लोक आहेत, जे न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या 14.9% टक्के आहेत.
• सुमारे एक तृतीयांश माओरी लोक अजूनही त्यांची पूर्वजांची भाषा बोलतात, त्याचबरोबर माओरी समुदायातील बहुसंख्य लोक इंग्रजी देखील बोलतात.
• माओरी लोकांचे विशिष्ट पोशाख आहेत जे त्यांच्या भूमीशी आणि पूर्वजांच्या आत्म्यांशी त्यांच्या मजबूत संबंधाचे प्रतीक आहेत.
हाका नृत्य काय आहे ?
• माओरी संस्कृतीच्या सर्वात प्रसिद्ध पैलूंपैकी एक म्हणजे हाका नृत्य.
• हे एक युद्ध नृत्य (War Dance) आहे.
• चेहऱ्यावरील तीव्र भाव, ताल आणि हालचाली द्वारे विशिष्ट प्रकारचे एक शक्तिशाली आणि अर्थपूर्ण असे युद्ध नृत्य.
![[ Maori Sanskrutichi, hakka nrutya, hakka dance, yuddha nrutya, war dance ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Maori-Community-Haka_Nrutya_1732451066170.webp)
टा मोको (Ta Moko) म्हणजे नेमकं काय ?
• माओरी लोकांची आणखी एक प्रमुख ओळख म्हणजे त्यांचे टॅटू, जे त्यांच्या चेहऱ्यावर दिसू शकतात.
• या टॅटूंना ‘टा मोको’ असे म्हणतात.
• ‘टा मोको’ एक पारंपारिक माओरी कला प्रकार आहे.
• ‘टा मोको’ डिझाईन्स प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळी ओळख आहे.
• एखाद्या व्यक्तीची सामाजिक स्थिती, त्यांची वंशावली, त्यांनी समाजासाठी काय केले आहे आणि बरेच काही यांचे चित्रण म्हणजे ‘टा मोको’ टॅटू.
![[ TaMoko mhanje kay, cheryavar tattoo, paramparik kala prakar, pratyek vyaktisathi ek vegli olakh ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Maori-Community-TaMoko_1732451100604.webp)
वेटांगी करार काय आहे ?
What is the Treaty of Waitangi ?
• हा करार १८४० मध्ये ब्रिटीश क्राउन (न्यूझीलंड सरकारद्वारे प्रतिनिधित्व) आणि न्यूझीलंडमधील स्थानिक लोकांचे प्रतिनिधी, माओरी जमाती आणि उप-जमाती यांच्यात झाला होता.
• दोन्ही पक्षांमधील शांतता आणि भागीदारी सुनिश्चित करताना न्यूझीलंडचा विकास करणे हा या कराराचा उद्देश होता.
• या कराराने माओरी लोकांच्या हिताचे रक्षण करण्याचे आणि नागरी समानतेची पुष्टी करण्याचे वचन दिले आहे.
![[ 1840, British Crown, Waitangi karar, maori lokanchya hitache rakshan karnyache anni naagri samantechi pushti karnyache vachan, maori anni newzeland vikas karar ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Maori-Community-Treaty-of-Waitang_1732451118706.webp)
पॉलिनेशिया म्हणजे काय ?
• पॉलिनेशिया हा ओशनिया खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे.
• पॉलिनेशिया हा पॅसिफिक महासागराच्या विस्तृत प्रदेशात पसरलेल्या 1,000 पेक्षा जास्त बेटांचा समूह आहे.
• याला पॉलिनेशियन त्रिकोण म्हणूनही ओळखले जाते.
• उत्तरेला हवाई, आग्नेयेला इस्टर आयलंड आणि नैऋत्येस न्यूझीलंडने वेढलेला आहे.
