
चालू घडामोडी 18, नोव्हेंबर 2024 | भारताचे पहिले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र | India’s First Long-Range Hypersonic Missile
![[ India’s first long-range hypersonic missile, hypersonic missile mhanje Kay, hypersonic kshepnastra, hypersonic kshepnastra kontya deshankade ahe, hypersonic missile advantage, hypersonic kshepnastra fayde, hypersonic kshepnastra vaishisht, India's missile, defence, defence technology, vinyan ani tantradnyan notes marathi madhe, sanrakshan, bhartache pahile hypersonic missile, bhartache pahile hypersonic kshepnastra, DRDO, Dr APJ Abdul Kalam Missile Complex, Dr APJ Abdul Kalam bet, Dr APJ Abdul Kalam island, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Long_Range_Hypersonic_Missile_1732453763198.webp)
भारताचे पहिले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र
India’s First Long-Range Hypersonic Missile
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. याबद्दल योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
A. ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.
B. हे क्षेपणास्त्र स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले आहे.
C. हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या कमीत कमी 2 पटींने वेगवान.
पर्याय :
1. A आणि B बरोबर
2. B आणि C बरोबर
3. A आणि C बरोबर
4. A, B आणि C बरोबर
उत्तर : A आणि B बरोबर
• हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या कमीत कमी 5 पटींने वेगवान.
बातमी काय आहे ?
• भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) ने भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
• ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.
• हे `हायपरसॉनिक` क्षेपणास्त्र सशस्त्र दलांसाठी 1500 किलोमीटरहून अधिक अंतरावर विविध प्रकारची स्फोटके, गुप्तचर उपकरणे किंवा इतर युद्धसामग्री (पेलोड) वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची निर्मिती कोणी केली ?
हे क्षेपणास्त्र डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुल, हैदराबादमधील प्रयोगशाळा तसेच DRDO च्या इतर प्रयोगशाळा आणि औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले आहे.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे म्हणजे काय ?
हायपरसॉनिक मिसाइलचे वैशिष्ट्य काय आहेत ?
• हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या कमीत कमी 5 पटींने वेगवान .
• हायपरसॉनिक याला मॅक-५ ( Mach-5) असेही म्हणतात.
• हायपरसॉनिक क्रूझ मिसाइल त्यांच्या संपूर्ण उड्डाणात हायपरसॉनिक वेग टिकवून ठेवण्यासाठी स्क्रॅमजेट इंजिनचा (Scramjet Engines) वापर करतात.
• स्क्रॅमजेट इंजिनच्या वापरामुळे आयत्या वेळी त्यांची दिशा बदलणे शक्य असते.
• हायपरसॉनिक मिसाइल कमी उंचीवर उड्डाण करतात त्यामुळे ते क्षत्रूच्या रडारवर (टेहळणीच्या) कक्षात सहजतेने येत नाहीत.
हायपरसॉनिक मिसाइल कोणत्या देशांकडे आहे ?
• चीन, रशिया आणि अमेरिका हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बनवण्याच्या स्पर्धेत खूप पुढे आहेत.
• हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे या क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले आहे.
• फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, इराण आणि इस्रायल हे देश देखील हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली (Hypersonic Missile Systems) विकसित करण्याच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करत आहेत.
The @DRDO_India has successfully conducted a flight trial of its long range hypersonic missile on 16th Nov 2024 from Dr APJ Abdul Kalam Island, off-the-coast of Odisha.
Raksha Mantri Shri @rajnathsingh has congratulated DRDO, Armed Forces and the Industry for successful flight… pic.twitter.com/wq7yM2YS9f
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) November 17, 2024