
चालू घडामोडी 19, नोव्हेंबर 2024 | देशातील ५६ वा व्याघ्रप्रकल्प कोणता ?
![[ Guru Ghasidas-Tamor Pingla Tiger Reserve, Chhattisgarh Tiger reserve, Minister for Environment, Forest and Climate Change, project Tiger, vyagrha prakalp, bhartatil sarvat motha vyagrha prakalp konta, Guru Ghasidas-Tamor Pingla vyagrha prakalp kontya rajyat ahe, bhartat kiti vyagrha prakalp ahe, how many tiger reserve in India, environment notes, paryavaran notes Marathi madhe, Zoological Survey of India, abhayaranya, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/56th-Tiger-Reserve-of-the-country_1732527100059.webp)
देशातील 56वा व्याघ्रप्रकल्प कोणता ?
56th Tiger Reserve of the Country
Subject : GS - पर्यावरण - व्याघ्रप्रकल्प
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच देशातील ५६ वा व्याघ्रप्रकल्प म्हणून गुरु घासीदास-तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्पासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर हा व्याघ्रप्रकल्प खालील पैकी कोणत्या राज्यात आहे ?
1. पंजाब
2. हिमाचल प्रदेश
3. छत्तीसगड
4. आंध्र प्रदेश
उत्तर : छत्तीसगड (Chhattisgarh)
बातमी काय आहे ?
देशातील ५६ वा व्याघ्रप्रकल्प म्हणून छत्तीसगडमधील गुरु घासीदास-तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्पासाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गुरु घासीदास-तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्पा बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
Guru Ghasidas - Tamor Pingla Tiger Reserve
• गुरु घासीदास-तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्प छत्तीसगड राज्याच्या उत्तर भागात स्थित आहे.
• या व्याघ्रप्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 2,829.38 चौ. किमी आहे.
• गुरु घासीदास-तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्प देशातील 3 रा मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.
• हा व्याघ्रप्रकल्प पश्चिमेला मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पास आणि पूर्वेला झारखंडच्या पलामू व्याघ्र प्रकल्पाशी जोडलेला आहे.
![[ paschimela madhya pradeshchya bandhavgad vyagra prakalp, purvela jharkhand palamu vyagrah prakalp, 3ra motha vyagrah prakalp, 2829.38 sq. km. shetra ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/56th-Guru-Ghasidas-Tamor-Pingla-Tiger-Reserve-Map_1732526082102.webp)
जैवविविधता :
• हे राखीव क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध आहे.
• भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणा नुसार (Zoological Survey of India) येथे एकूण 753 प्रजाती आहेत.
• ज्यात 365 अपृष्ठवंशी प्रजाती (Invertebrates Species) आणि 388 पृष्ठवंशी प्रजातींचा (Vertebrates Species) समावेश आहे.
प्रोजेक्ट टायगर काय आहे ?
• प्रोजेक्ट टायगर हा भारतातील वन्यजीव संरक्षण उपक्रम आहे, जो 1973 मध्ये सुरू करण्यात आला होता.
• भारतामध्ये धोक्यात असलेल्या वाघाच्या संरक्षणासाठी भारत सरकारच्या पर्यावरण , वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रोजेक्ट टायगर सुरू केला.
• प्रोजेक्ट टायगरचे प्राथमिक उद्दिष्ट समर्पित व्याघ्र अभयारण्य निर्माण करून वाघांची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात देखभाल करणे आणि त्यांची संख्या वाढवणे हे आहे.
• 1973 मध्ये केवळ 9 व्याघ्रप्रकल्पापासून प्रोजेक्ट टायगरची सुरवात झाली आज (नोव्हेंबर 2024) भारतात 56 व्याघ्रप्रकल्प आहे.
भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता ?
भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
1. देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर-श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आहे.
2. देशातील 2 रा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आसाममधील मानस व्याघ्र प्रकल्प आहे.
3. तर देशातील 3 रा मोठा व्याघ्र प्रकल्प छत्तीसगडमधील गुरु घासीदास-तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्प आहे.
![[ andra pradesh, nagarjunsagar shrisellam vyagrah prakalp, assam, manas vyagrah prakalp, chhatisgarh guru ghasidas tamor pingla vyagraprakalp, bhartatil 3 mothe vyagrah prakalp ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/56th-Bhartatil-sarvat-motha-vaga-prakalp_1732526114406.webp)