
चालू घडमोडी 20, नोव्हेंबर 2024 | संयुक्त विमोचन 2024 | Sanyukt Vimochan 2024
![[ Sanyukt Vimochan 2024, Sanyukt Vimochan Sarav kay ahe, Sanyukt Vimochan sarav kothe par padla, Sanyukt Vimochan sarsvacha hetu, Sanyukt Vimochan sarav ka mahatvacha ahe, Apatti vyavsthapan, Apatti nivaran, madat Kary, bachav Kary, pur, mahapur, chakrivadal, flood, earthquake, landslide, bhusakhalan, disaster, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Sanyukt_Vimochan_2024_1732687112886.webp)
संयुक्त विमोचन 2024
Sanyukt Vimochan 2024
Subject : GS - भूगोल, आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकताच भारतीय लष्कराचा 'संयुक्त विमोचन 2024' सराव पार पडला. या सरावा बद्दल योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) हा सराव चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे पार पडला.
ब) या सरावाचे उद्दीष्ट आपत्ती निवारण आणि आपत्तीच्या वेळी जलदगतीने मदत कार्य करणे हे आहे.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे
4. अ आणि ब दोन्ही चूक आहे
उत्तर : फक्त ब बरोबर
हा सराव अहमदाबाद आणि पोरबंदर येथे पार पडला.
बातमी काय आहे ?
भारतीय लष्कराने 18 - 19 नोव्हेंबर 2024 रोजी अहमदाबाद आणि पोरबंदर येथे ' संयुक्त विमोचन 2024 ' या सरावाचे आयोजन केले होते.
'संयुक्त विमोचन 2024' सरावा बद्दल परिक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 'संयुक्त विमोचन 2024' हा बहुपक्षीय वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण ( Humanitarian Assistance and Disaster Relief ) सराव आहे.
• भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडच्या कोणार्क पथकाने हा सराव संचलित केला.
'संयुक्त विमोचन 2024' सराव कसा पार पडला ?
पहिल्या दिवशी : 18 नोव्हेंबर 24 रोजी, अहमदाबाद येथील सरावाच्या उद्घाटन कार्यक्रमात 'गुजरातच्या किनारी प्रदेशातील चक्रीवादळ' या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणारा महत्त्वपूर्ण सराव प्रदर्शित करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी : 19 नोव्हेंबर 24 रोजी पोरबंदर येथील चौपाटीवर बहु-संस्था क्षमता प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
बहु-संस्था क्षमतेच्या प्रात्यक्षिकात विविध संस्थांचे समन्वित लॉजिस्टिक, जलद प्रतिसाद आणि कल्पित चक्रीवादळ परिस्थितीत प्रभावी आपत्ती व्यवस्थापन धोरणांचा सराव केला जातो.
या कार्यक्रमात कोण कोणत्या एजन्सी सहभागी झाल्या ?
या कार्यक्रमात भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय वायुसेना, भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसेच नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी इतर केंद्रीय आणि राज्य संस्था सहभागी झाल्या.
'संयुक्त विमोचन 2024' सरावाचे उद्दीष्टे काय आहे ?
• आपत्ती निवारण आणि आपत्तीच्या वेळी जलदगतीने मदत कार्य करणे.
• यासाठी वेगवेगळ्या एजन्सी सोबत सहकार्य आणि सामंजस्य वाढवणे.
• भारतीय सशस्त्र दलाने अलिकडच्या काळात, शोध आणि बचाव मोहिमा, मानवतावादी मदत आणि वैद्यकीय सहाय्याची तरतूद यासह आपत्ती निवारण कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
• 'संयुक्त विमोचन 2024' हा सराव भारताची तयारी आणि प्रतिसाद क्षमता मजबूत करण्यासाठी, जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनात आपले नेतृत्व मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण म्हणजे नेमकं काय ?
What exactly is Humanitarian Assistance and Disaster Relief?
• मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण हे एक लष्करी सहकार्य आहे ज्याचे उद्दिष्ट आपत्तीच्या वेळी जलदगतीने मदत कार्य करणे.
• आपत्तीच्या वेळी लोकांचे प्राण वाचवणे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीचे निराकरण करणे.
उदाहरणार्थ : पूर, भूस्खलन, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तींच्या वेळी भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तसेच अन्य एजन्सी हे मदतीसाठी धावून येतात.
![[ sanyukt vimochan sarav 2024, manavtavaadi sahhyaa anni apaati nivaran mhanje nemka kay, what exactly is humanitarian assistance and disaster relief, pur, bhusakhalan, chakrivadal , ashya apatinchya veles bhartiya lashkar, ndrf tasech anyay dal kaam kartat, appaticheya veles lokanche jiv vachavne]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Sanyukt-Vimochan-Sarav-2024_1732686567945.webp)