
चालू घडामोडी 21, नोव्हेंबर 2024 | "भू-नीर" पोर्टल काय आहे ? | Bhu-Neer
![[ hu-Neer Portal mhanje Kay, Bhu-Neer Portal Kay ahe, ground water, jaminikhalil Pani, vihir, bhujal Satha, bhujal Patli, panyache strot, water sources, Pani adva Pani jirva, panyache vyavsthapan, Pani vapra, groundwater depletion, groundwater management, groundwater level, water scarcity, paryavaran sanrakshan Kayda, forest protection act, water management authority, ministry of water, CENTRAL GROUND WATER AUTHORITY, kendriya bhujal pradhikaran, jalshakti mantralay, National Informatics Centre, NOC Kashi bhetel, No Objection Certificate, government permission, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Bhu-Neer-Portal_1732857269507.webp)
"भू-नीर" पोर्टल काय आहे ?
Bhu-Neer Portal
Subject : GS - सरकारी योजना, पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतेच भारत सरकारने “भू-नीर” पोर्टल लाँच केले. हे पोर्टल खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. जमिन मोजनी संदर्भात
2. धरण बांधणी संदर्भात
3. जमिनीतील पाणी वापरण्या संदर्भात
4. यांपैकी नाही
उत्तर : जमिनीतील पाणी वापरण्या संदर्भात
बातमी काय आहे ?
• 8 व्या भारतीय जल सप्ताह-2024 समारोप सोहळ्यात जलशक्ती मंत्रालयाने “भू-नीर” पोर्टल लाँच केले.
• हा भारतातील भूजल नियमन वाढविण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
![[ 8 vya bhartiya jal saptaha 2024 sohalyaat jalshakti mantralyane bhuneer portal launch kele, shri c. r. patil jalshakti mantralay che mantri yanchya haste bhuneer portal launch kele gele ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Bhu-Neer-Portal-Inaugration_1732856435565.webp)
“भू-नीर” पोर्टल काय आहे ?
“भू-नीर” पोर्टल मुख्य उद्देश कोणता ?
• देशभरातील भूगर्भजलाच्या प्रभावी नियमनासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
• भूजलाच्या (Ground water) शाश्वत वापरासाठी पारदर्शकता, कार्यक्षमता, आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे हा भू-नीर पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.
“भू-नीर” पोर्टल का महत्त्वाच आहे ?
“भू-नीर” पोर्टलवर कोणती माहिती मिळेल ?
• या पोर्टलद्वारे केंद्रीय डेटाबेसचा वापर करून भूजलासंबंधित अनुपालन, धोरणे आणि शाश्वत पद्धतींची माहिती मिळवता येईल.
• “भू-नीर” पोर्टलवर भूगर्भजलाच्या (Ground Water) वापराबाबत असलेल्या कायदेशीर चौकटीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
• भूगर्भजल उपसा आणि संबंधित नियमांबाबत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील धोरणांची माहिती देखील येथे उपलब्ध आहे.
“भू-नीर” पोर्टलचे वैशिष्ट्य कोणते ?
• पॅन-आधारित सिंगल आयडी प्रणाली
• QR कोडसह ना हरकत प्रमाणपत्र (NOC-No Objection Certificate)
• वापरण्यास सोपी आणि माहितीपूर्ण यंत्रणा
• “भू-नीर” पोर्टल पूर्वीच्या “NOCAP” पोर्टलच्या तुलनेत अधिक प्रगत आहे.
भू-नीर पोर्टल कोणी बनवले आहे ?
भू-नीर पोर्टल केंद्रीय भूजल प्राधिकरणाने, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रा च्या सहकार्याने विकसित केले आहे.
केंद्रीय भूजल प्राधिकरण म्हणजे काय ?
CENTRAL GROUND WATER AUTHORITY
• पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 च्या अंतर्गत केंद्रीय भूजल प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
• मुख्य उद्दिष्ट : देशातील भूजल संसाधनांच्या विकास आणि व्यवस्थापनाचे नियमन आणि नियंत्रण करणे हे केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ( National Informatics Centre) काय आहे ?
National Informatics Centre काय काम करते ?
• राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) हे भारत सरकारचे तंत्रज्ञान भागीदार आहे.
• NIC हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) च्या अंतर्गत काम करते .
• NIC ची स्थापना 1976 मध्ये करण्यात आली.
• केंद्र आणि राज्य सरकारांना तंत्रज्ञानावर आधारित उपाय प्रदान करणे हे NIC चे मुख्य उद्दिष्ट आहे.