
चालू घडामोडी 21, नोव्हेंबर 2024 | 55th International Film Festival of India : 2024
![[ 55th International Film Festival of India, International Film Festival of India 2024, bhartacha antarrashtriya chitrapat mahotsav, Indian cinema, Bhartiya chitrapat, IFFI festival, IFFI Kay ahe, director, new director, bhartacha antarrashtriya chitrapat sohalyabaddal kahi important points, bhartacha antarrashtriya chitrapat mahatsov ayojan kon karta, national film development corporation, rashtriya chitrapat vikas mahamandal, mahiti anni prasaran mantralay, goa sarkar, bhartiya chitrapat udyog, bhartacha antarrashtriya chitrpat mahatsovche udhiste kay ahe , bhartacha antarrashtriya chitrpat mahatsovche ka ayojit kela jaato, 2024 cha bhartacha antarrashtriya chitrapat mahatsov khaas ka asnaar ahe, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/IFFI_1732856809014.webp)
भारताचा 55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : 2024
55th International Film Festival of India : 2024
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताचा 55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव खालील पैकी कोठे आयोजित करण्यात आला ?
1. मुंबई
2. नवी दिल्ली
3. पणजी
4. चेन्नई
उत्तर : पणजी
बातमी काय आहे ?
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) 55व्या आवृत्तीची सुरुवात नुकतीच गोव्यातील पणजी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाली.
भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल परिक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला इफ्फी म्हणजे International Film Festival of India (IFFI) म्हणून ही ओळखले जाते.
• भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना 1952 मध्ये करण्यात आली.
• हा आशियातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे.
• या कार्यक्रमाची यंदाची (2024) 55 वी आवृत्ती आहे.
• 2004 पासून भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी चे) आयोजन दरवर्षी गोव्यात केले जाते.
• गोवा हे या महोत्सवाच्या आयोजनाचे कायमस्वरुपी ठिकाण नावारूपाला आले आहे.
• इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर अँड असोसिएशन (FIAPF) द्वारे स्पर्धात्मक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट महोत्सव म्हणून मान्यताप्राप्त दक्षिण आशियातील हा एकमेव चित्रपट महोत्सव आहे.
भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोण करतं ?
• या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (National Film Development Corporation), माहिती आणि प्रसारण मंत्रालय (भारत सरकार), गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या संयुक्त सहकार्याने केले जाते.
भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्दिष्ट काय आहे ?
भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव का आयोजित केला जातो ?
• जगातील चित्रपट निर्मात्यांना चित्रपट कलेतील त्यांची उत्कृष्टता प्रक्षेपित करण्यासाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देणे,
• विविध राष्ट्रांच्या चित्रपट संस्कृतींना त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या संदर्भात समजून घेणे आणि त्यांचे कौतुक करणे.
• जगातील लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्य वाढवणे हे इफ्फीचे उद्दिष्ट आहे.
2024 चा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव खास का असणार आहे ?
• यंदाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे दिग्गजांना आदरांजली वाहणारा, उदयोन्मुख प्रतिभेचा सोहळा आणि त्याचवेळी सर्वसमावेशकतेचे मूल्य जपणारा महोत्सव असणार आहे.