
चालू घडामोडी 22, नोव्हेंबर 2024 | भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक | Comptroller and Auditor General of India
![[ comptroller and auditor general of india, bhartache niyantrak anni mahakelkha parikshak, sanjay murthy kon ahait, bhartache niyantrak anni mahakelkha parikshak sandhabatil bhartiya rajyaghatnetil kalam konti, bhartache niyantrak anni mahakelkha parikshakanchi nemnuk kon kartat, kalam 148 te 151, niyukti rashtrapati kartat, bhartache niyantrak anni mahakelkha parikshak padacha karyakal kiti varsha ahe, 6 varshe kinva 65 varshe purne hoieparyant, CAG chi kartavya anni adhikar konti, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/CAG_1732890572082.webp)
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
Comptroller and Auditor General of India
Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापाल (CAG) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1. श्री गिरीशचंद्र मुर्मू
2. श्री के. संजय मूर्ती
3. श्री धनंजय चंद्रचूड
4. श्री राजीव कुमार
उत्तर : श्री के. संजय मूर्ती (Shri K. Sanjay Murthy)
![[ bhartache niyantrak anni mahakelkha parikshak, sanjay murthy yani shapath ghetli, rashtrapati draupadi murmu, comptroller and auditor general of india ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/CAG-Sanjay-Murthy_1732888912724.webp)
बातमी काय आहे ?
• राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे 21 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून श्री के. संजय मूर्ती यांनी शपथ घेतली.
• त्यांना या पदाची शपथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली.
श्री के. संजय मूर्ती सर यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्री के संजय मूर्ती हे हिमाचल प्रदेश केडरमधील 1989 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहे.
• श्री के संजय मूर्ती यांनी 21 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) ची प्रतिष्ठित भूमिका स्वीकारली.
• श्री के संजय मूर्ती हे स्वतंत्र भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) आहेत.
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
सर्वोच्च प्राधिकरण :
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे राष्ट्रीय आणि राज्य सरकारांच्या खर्चाच्या बाह्य आणि अंतर्गत लेखापरीक्षणासाठी जबाबदार सर्वोच्च प्राधिकरण आहे.
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षका संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील कलम कोणती ?
भारताच्या घटनेच्या भाग 5 मधील कलम 148 ते 151 हे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांसंदर्भात आहेत.
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांची नेमणूक कोण करतात ?
• भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 अंतर्गत भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
• राष्ट्रपती भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकांना पदाची शपथ देतात .
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक पदाचा कार्यकाळ किती वर्षें आहे ?
CAG पद ग्रहण केल्यापासून 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी घडेल तिथपर्यंत)
CAG ची कर्तव्य आणि अधिकार कोणती ?
• भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या सर्व पावत्या आणि खर्चाचे लेखापरीक्षण करते.
• सरकारद्वारे मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था आणि प्राधिकरणांच्या खात्यांची लेखापरीक्षणही करते.
• कंपनी कायदा 2013 नुसार सरकारी कंपन्यांच्या खात्यांचे ऑडिट करते.
• कर्ज, ठेवी आणि पैसे ठेवण्याची संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व व्यवहारांचे ऑडिट करते.
• जनतेचा पैसा म्हणजेच सार्वजनिक निधी कार्यक्षमतेने आणि इच्छित हेतूंसाठी वापरला जातो याची खात्री करते.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कलम 151 अन्वये महालेखा परीक्षक केंद्र सरकारच्या लेखांविषयी अहवाल कोणाला सादर करतात ?
1. राष्ट्रपती
2. पंतप्रधान
3. गृहमंत्री
4. वित्तमंत्री
उत्तर : राष्ट्रपती
• कलम 151 (1) अन्वये महालेखा परीक्षक केंद्र सरकारच्या लेखांविषयी अहवाल (Audit Report) राष्ट्रपतींना सादर करतात.
• राष्ट्रपती हे अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करतात.
प्रश्न) कलम 151 अन्वये महालेखा परीक्षक राज्यांच्या लेखांविषयीचे अहवाल कोणाला सादर करतात ?
1. राज्यपाल
2. मुख्यमंत्री
3. गृहमंत्री
4. वित्तमंत्री
उत्तर : राज्यपाल
कलम 151 (2) अन्वये महालेखा परीक्षक राज्यांच्या लेखांविषयीचे अहवाल (Audit Report) राज्यपालास सादर करतात.
राज्यपाल हे अहवाल राज्य विधान मंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करतात.
प्रश्न) भारताचे पहिले नियंत्रक महालेखा परीक्षक कोण आहेत ?
उत्तर : व्ही. नरहरी राव (1950 ते 1954) हे भारताचे पहिले नियंत्रक महालेखा परीक्षक होते.