
चालू घडामोडी 23, नोव्हेंबर 2024 | प्रसार भारतीचे WAVES काय आहे ? | WAVES OTT Platform
![[ WAVES OTT Platform, OTT Platform mhanje Kay, OTT full form, Netflix, Amazon prime, Disney+, waves, hotstar, apple TV, zee5, durdarshan, prasar Bharti, dr Sahyadri, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/WAVES-OTT-PRASAR-BHARTI_1733318646068.webp)
प्रसार भारतीचे WAVES काय आहे ?
WAVES OTT Platform
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रसार भारतीने आपला OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे त्याचे नाव काय ?
1. Netflix
2. Disney+
3. Waves
4. Bhu Neer
उत्तर : Waves
बातमी काय आहे ?
गोव्यामध्ये सुरु असलेल्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसार भारतीच्या WAVES (वेव्ह्ज), या OTT व्यासपीठाचे उद्घाटन केले.

OTT म्हणजे काय ?
• OTT चा फूल फॅार्म (पूर्ण रूप) Over The Top असा आहे.
• OTT (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्म इंटरनेटद्वारे थेट दर्शकांना मीडिया सामग्री वितरीत करतात.
• उदाहरणार्थ : Netflix, Disney+ , Amazon Prime Video, हे OTT प्लॅटफॉर्मचे काही उदाहरणे आहेत.
• OTT हे केबल किंवा सॅटेलाइट सारख्या पारंपारिक वितरण पद्धतींना मागे टाकून लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म बनले आहे.
• OTT प्लॅटफॉर्म अनेक उपकरणांवर कार्य करण्यासाठी डिझाइन केले आहेत जसे की स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि डेस्कटॉप
OTT प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य काय आहे ?
• अनेक उपकरणांवर OTT वर कॅान्टेंन्ट बघता येतो जसे की स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप
• केबल किंवा सॅटेलाइ पेक्षा कमी खर्चिक असतात.
• फ्री आणि सबस्क्रिप्शन मॉडेल उपलब्ध असते.
• सोईनुसार आणि गरजेनुसार कॅान्टेंन्ट बघण्याचे स्वातंत्र्य.
• भौगोलिक सीमांचा अडथळा नसतो.
WAVES काय आहे ?
• WAVES हे प्रसार भारती या राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण माध्यमाचे OTT प्लॅटफॉर्म आहे.
• डिजिटल स्ट्रीमिंग सेवांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, ‘दूरदर्शन’, या भारताच्या अग्रगण्य सार्वजनिक प्रसार माध्यमाने OTT (ओव्हर-द-टॉप) व्यासपीठाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.
WAVES प्लॅटफॉर्मवर काय बघायला मिळू शकेल ?
• WAVES हे व्हिडिओ, फ्री-टू-प्ले गेमिंग, रेडिओ स्ट्रीमिंग, थेट टीव्ही स्ट्रीमिंग, 65 लाइव्ह चॅनल, व्हिडिओ आणि गेमिंग सामग्रीसाठी ॲप चा समावेश असलेले अनेक ॲप, आणि ऑनलाइन खरेदी, यासारख्या सेवा प्रदान करेल.
• वेव्ह्ज मध्ये चित्रपट, मालिका जसे की रामायण, महाभारत, शक्तिमान, फौजी 2.0, धार्मिक कार्यक्रम, क्रिकेट स्पर्धा. त्याचबरोबर
• अयोध्येतील प्रभू श्रीराम लल्लाची लाइव्ह आरती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात सारख्या लाईव्ह कार्यक्रमांचा समावेश आहे.
प्रसार भारती काय आहे ?
• प्रसार भारती हे एक भारतीय सरकारी मालकीचे सार्वजनिक प्रसारक (Public Broadcaster) आहे.
• ही एक वैधानिक स्वायत्त संस्था आहे जी संसदेच्या कायद्याने स्थापन केली आहे आणि त्यात दूरदर्शन टेलिव्हिजन प्रसारण आणि आकाशवाणी यांचा समावेश आहे.
• भारताच्या संसदेने 1990 मध्ये स्वायत्तता देण्यासाठी प्रसार भारती कायदा संमत केला.
प्रसार भारतीचे काही प्रमुख उद्दिष्ट्ये :
• देशाची एकता आणि अखंडता आणि राज्यघटनेत अंतर्भूत असलेली मूल्ये अबाधित राखणे.
• सार्वजनिक हिताच्या, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सर्व बाबींवर मुक्तपणे, सत्यतेने आणि वस्तुनिष्ठपणे बातमी/माहिती देण्याच्या नागरिकांच्या अधिकाराचे रक्षण करणे त्यासाठी माहितीचा न्याय्य आणि संतुलित प्रवाह सादर करणे.
• राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे.