
चालू घडामोडी 02, डिसेंबर 2024 | सीमा सुरक्षा दलाचे 60वे स्थापना दिवस | 60th Raising Day of BSF
![[ Border Security Force, BSF sthapna din, Border Security Force Raising Day, Seema Suraksha dal, Seema Suraksha Bal sthapna din, bsf DG, bsf Che mahasanchalak, Shri K F Rustamji, Shri Daljit Singh Chawdhary, motto, slogan, bsf che bodhvakya, bsf logo, bsf Bharti, bsf exam, bsf questions, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, ssc-gd-bharti, ssc-gd-admit-card ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/60TH-BSF-RAISING-DAY-SEEMA-SURAKSHA-DAL-STAPHNA-DIN_1733376988239.webp)
सीमा सुरक्षा दल स्थापना दिन
60th Raising Day of BSF
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी सीमा सुरक्षा दल (BSF) स्थापना दिन केव्हा साजरी केला जातो ? (SSC GD)
1) 10 मार्च
2) 8 ऑक्टोबर
3) 21 ऑक्टोबर
4) 1 डिसेंबर
उत्तर : 1 डिसेंबर
• केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) स्थापना दिन : 10 मार्च
• भारतीय वायुसेना दिन : 8 ऑक्टोबर
• पोलीस स्मृती दिन : 21 ऑक्टोबर
• सीमा सुरक्षा दल (BSF) स्थापना दिन : 1 डिसेंबर
सीमा सुरक्षा दल (BSF) बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
BSF : Border Security Force
सीमा सुरक्षा दलाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 1965 पर्यंत भारताच्या पाकिस्तानच्या सीमेवर राज्य सशस्त्र पोलीस बटालियनचे व्यवस्थापन होते.
• 9 एप्रिल 1965 रोजी पाकिस्तानने कच्छमधील सरदार पोस्ट, छर बेट आणि बेरिया बेटावर हल्ला केला.
• या घटनेमुळे सशस्त्र आक्रमणाचा सामना करण्यासाठी भारत सरकारला एका विशेष केंद्र नियंत्रित सीमा सुरक्षा दलाची गरज भासली, जी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सशस्त्र आणि प्रशिक्षित असेल.
• समितीच्या शिफारशीनुसार 1 डिसेंबर 1965 रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
• BSF हे गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते.
सीमा सुरक्षा दलाचे पहिले महासंचालक कोण आहेत ?
• श्री के. एफ. रुस्तमजी (Shri K F Rustamji), हे BSF चे पहिले महासंचालक होते.
• BSF च्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
• यामुळे त्यांना BSF चे Founding Father म्हणून ही ओळखले जाते.
सीमा सुरक्षा दलाचे सध्याचे महासंचालक कोण आहेत ?
श्री. दलजीत सिंह चौधरी (IPS) सर BSF चे वर्तमान महासंचालक (DIRECTOR GENERAL) आहेत.
सीमा सुरक्षा दलाचे बोधवाक्य (Motto) काय आहे ?
जीवन पर्यंत कर्तव्य (Duty Until Death) हे सीमा सुरक्षा दलाचे बोधवाक्य आहे .
BSF चे विशेष युनिट्स कोणते ?
• हवाई शाखा
• नौदल शाखा
• तोफखाना रेजिमेंट
• क्रीक क्रोकोडाइल कमांडो फोर्स
• थार वाळवंटातील विशेष ऑपरेशन्ससाठी उंटांची तुकडी (Camel Cavalry)
BSF कोठे तैनात आहेत ?
अंदाजे 2.6 लाख जवानांचा समावेश असलेले BSF
• भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा
• भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा
• नियंत्रण रेषेवर (LoC)
• काश्मीर खोऱ्यात घुसखोरीविरोधी भूमिका
• ईशान्य प्रदेशातील बंडखोरी
• ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांमध्ये नक्षलविरोधी ऑपरेशन क्षेत्रांमध्ये तैनात आहे.
• तसेच BSF पाकिस्तान आणि बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरील एकात्मिक चेक पोस्टची सुरक्षा देखील करत आहे.
BSF चे काही महत्वाचे योगदान :
• 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात BSF ने देश संरक्षणा बरोबर अडकलेल्या बांग्लादेशी नागरिकांना मदत करून माणूसकीचे दर्शन घडविले.
• 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान, BSF ने सैन्याबरोबर एकजुटीने सर्व सामर्थ्याने देशाच्या अखंडतेचे रक्षण केले.
• BSF चे जवान गेल्या 10 वर्षांपासून मणिपूरमध्ये अंतर्गत सुरक्षा कर्तव्य बजावत आहेत आणि त्या भागात बंडखोरीचा यशस्वीपणे सामना करत आहेत.
• 26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी, BSF ने संकटग्रस्त लोकांना मदत केली.
• BSF प्रसिद्ध करतारपूर कॉरिडॉरवरील सुरक्षेची जबाबदारी हाताळत आहे.
• BSF ने कोविड महामारी दरम्यान सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना आवश्यक मदत प्रदान केली.
• 2014 मध्ये काश्मीर पूर, 2018 मध्ये केरळ पूर आणि 2013 मधील केदारनाथ दुर्घटना यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तैनातीच्या क्षेत्रात BSF ने संकटकाळी तत्परतेने मदत पुरवली.