
चालू घडामोडी 03, डिसेंबर 2024 | आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस | International Day of Persons with Disabilities 2024
![[ International Day of Persons with Disabilities 2024, , jagtik apang divas, jagtik divyang din, antarrashtriya divyang divas, handicap, antarrashtriya divyang divasachi sankalpana, theme, International Day of Persons with Disabilities 2024 theme, United Nations, UN, Convention on the Rights of Persons with Disabilities, population, Divyang Kalyan vibhag, Persons with Disabilities Welfare Department, maharashtra shasan, ApanganSathi sarkari yojna, government Scheme for Persons with Disabilities, Deendayal Divyangjan punarvasan yojna, jilha apangatva punarvasan Kendra, apang vyaktiche Hakk, scholarship, Deendayal Divyangjan Rehabilitation Scheme (DDRS), District Disability Rehabilitation Centre, Schemes For Implementation of Rights of Persons with Disabilities Act 2016, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/ANTARRASHTRIYA-DIVYANG-DIWAS_1733390223944.webp)
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस
International Day of Persons with Disabilities 2024
Subject : GS - दिनविशेष, सरकारी योजना
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानार्थ दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस केव्हा आयोजित करण्यात येतो ?
1. 24 ऑक्टोबर
2. 12 नोव्हेंबर
3. 1 डिसेंबर
4. 3 डिसेंबर
उत्तर : 3 डिसेंबर
• 24 ऑक्टोबर : जागतिक पोलिओ दिवस
• 12 नोव्हेंबर : जागतिक न्यूमोनिया दिन
• 1 डिसेंबर : जागतिक एड्स दिन
• 3 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसा संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस दरवर्षी 3 डिसेंबर रोजी पाळला जातो.
• आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाला जागतिक दिव्यांग व्यक्ती दिन असेही म्हणतात.
दिव्यांग व्यक्तींची (वेगवेगळ्या सक्षम/अपंग व्यक्ती) व्याख्या काय आहे ?
• अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016 नुसार अशी व्यक्ती जी, दीर्घकालीन शारीरिक, मानसिक, बौद्धिक अथवा संवेदनाक्षम दौर्बल्य असून, जी समाजात सहभागी होताना इतरांसोबत विविध अडथळ्यांमुळे संवाद साधू शकत नाही.
• केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगत्वाचे 21 प्रवर्ग निश्चित केले आहेत
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
1992 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 47/3 ठरावाद्वारे 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस' घोषित करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाचे उद्दिष्ट काय आहे ?
• दिव्यांग व्यक्तींवरील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी.
• दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांची आणि गरजांची पूर्तता करण्यासाठी समाजात जागरुकता निर्माण करणे
• जगभरात दिव्यांगांची चिकाटी, नेतृत्व आणि त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे हे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाचे उद्दिष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
" सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे " ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाची संकल्पना आहे.
“Amplifying the leadership of Persons with Disabilities (PwDs) for an inclusive and sustainable future”.
अपंग व्यक्तींच्या हक्कांवरील अधिवेशन (Convention on the Rights of Persons with Disabilities) :
• संयुक्त राष्ट्रांनी 2006 मध्ये अपंग व्यक्तींच्या हक्कांवरील अधिवेशन स्वीकारले होते.
• भारताने या अधिवेशनावर 2007 मध्ये सही केली.
• हे अधिवेशन स्वीकारल्यामुळे शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा आणि इतर आंतरराष्ट्रीय विकास फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीमध्ये अपंग व्यक्तींचे हक्क आणि कल्याण अधिक महत्त्वाचे केले आहे.
भारतात आणि महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींची लोकसंख्या किती आहे ?
• 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 2.68 कोटी दिव्यांग आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या 2.21% आहेत.
• सन २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रामध्ये 29,69,392 दिव्यांग व्यक्ती असून त्यांची संख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 2.63% आहे.
• महाराष्ट्रात दि.15.12.2022 च्या अधिसूचनेन्वये दिव्यांग कल्याण हा नवीन मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्थापन करण्यात आला आहे.
दिव्यांगांसाठी सरकारी योजना/कार्यक्रम कोणते ?
• दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि न्याय व्यवस्थेतील सुविधा सुधारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.
• दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष धोरणे आणि कायदे तयार केले आहेत.
उदाहरणार्थ :
• दिव्यांग व्यक्तींना स्वैच्छिक कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ दिव्यांगजन पुनर्वसन योजना
• जिल्हा अपंगत्व पुनर्वसन केंद्र
• अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016 च्या अंमलबजावणीसाठी योजना
• दिव्यांग व्यक्तींना साधने आणि उपकरणांच्या खरेदी आणि (जागेवर) बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना
• दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण शिष्यवृत्ती