
चालू घडामोडी 06, डिसेंबर 2024 | बाटलीबंद पाणी आता "हाय रिस्क फूड" च्या श्रेणीत
![[ What is High Risk Foods, ucha jokhim Annapadarth, fssai, Food Safety and Standards Authority of India, Anna Suraksha, arogya ani kutumb Kalyan mantralay, BIS certification, fssai certification, food safety licence, Food Safety and Standards Act, 2006, drinking water, mineral water, mineral water is safe for health, Ministry of Health and Family Welfare, Government of India, FSSAI che adhikar anni karya konti, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair, chalu Ghadamodi Marathi, current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi, police Bharti chalu Ghadamodi, police Bharti prashnasanch, police Bharti GK prashna, Mpsc chalu Ghadamodi, sarkari Naukri, sarkari job, sarkari yojna, Maharashtra cha chalu Ghadamodi, Maharashtra government yojna, PSI syllabus, PSI cutoff, police Bharti syllabus, police Bharti cutoff, police Bharti merit, MPSC Sathi book, MPSC Sathi pustak, police Bharti Sathi pustak, police Bharti magil prashnapatrika, MPSC previous years question papers, Mumbai police Bharti, Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe, government GR, police Bharti result, MPSC result, SSC GD merit, sscgd syllabus, army Bharti merit, army Bharti result, UPSC Marathi, combine pariksha, talathi, talathi syllabus, talathi cutoff, talathi book list, talathi result, talathi merit, talathi jaga kiti ahe, saralseva exam, saralseva pariksha, saralseva result, zilha parishad Bharti, zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe, headline-news, maharashtra-news, jhattpatt-batmya, pib, marathi batmya, government new channel, Pib, akashvani, the Hindu, Indian express, Loksatta, Lokmat, Dainik Bhaskar, sansad news, editorial, sampadkiya, vishleshan, Loksabha news, rajyasabha news, SSC GD notes, sscgd question papers, sscgd exam answer, results, SSC GD admit card, sscgd ground, exam centre ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/HIGH-RISK-PLASTIC-BOTTLE_1733593360758.webp)
बाटलीबंद पाणी आता "हाय रिस्क फूड" च्या श्रेणीत | High Risk Foods
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ही स्वायत्त संस्था खालील पैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत आहे ?
1. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
2. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
3. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
4. गृह मंत्रालय
उत्तर : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare)
बातमी काय आहे ?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अलीकडेच पॅकेज केलेले पिण्याचे पाणी आणि मिनरल पाणी "उच्च-जोखमीचे खाद्यपदार्थ" म्हणून वर्गीकृत केले आहे.
उच्च-जोखमीचे खाद्यपदार्थ म्हणजे काय ?
What is High Risk Foods ?
उच्च-जोखीम असलेले खाद्यपदार्थ म्हणजे असे खाद्यपदार्थ की ज्यांना कठोर सुरक्षा प्रोटोकॉलची आवश्यकता असते कारण त्यांची चुकीची हाताळणी केल्यास सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
उच्च-जोखीम श्रेणी अंतर्गत इतर कोण- कोणते उत्पादने येतात ?
• दुग्धजन्य पदार्थ
• पोल्ट्री, मांस आणि मांस उत्पादने, ,
• मासे आणि सीफूड.
• अंडी आणि अंडी उत्पादने
• सर्व प्रकारची भारतीय मिठाई
• पोषक तत्व आणि विशेष पोषणनासाठी बनवलेली खाद्यपदार्थ
यांसारख्या खाद्यपदार्थांचा उच्च-जोखीमीचे असलेले खाद्यपदार्थ या प्रकारात समावेश होतो.
उच्च-जोखीम श्रेणीत आल्यानंतर काय होते ?
• पॅकिंग मधील पिण्याचे पाणी आणि मिनरल वॉटर ला हाय रिस्क फूड म्हणून लेबल लावले याचा अर्थ ही उत्पादने असुरक्षित आहेत असा होत नाही.
• ग्राहकांसाठी गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अशी उत्पादने अधिक सुरक्षा पूर्वक तपासूनच मग पॅकिंग केली जातात.
• उत्पादक आणि व्यवसाय करणाऱ्यांना अशा प्रोडक्ट ची नियमित तपासणी आणि थर्ड पार्टी ऑडिट करणे बंधनकारक असते.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे काय ?
Food Safety and Standards Authority of India (FSSAI)
• FSSAI ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची वैधानिक संस्था आहे.
• FSSAI ची स्थापना 5 सप्टेंबर 2008 रोजी अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 अंतर्गत करण्यात आली.
FSSAI चे अधिकार आणि कार्य कोणती ?
• हे अन्न व खाद्य उत्पादना संबंधात मानके (Standards) आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे.
• खाद्य व्यवसाय करणाऱ्यांची नोंदणी करणे, त्यांना परवाना(licensing), आणि मान्यता प्रदान करते.
• प्रयोगशाळातील अन्न व खाद्य उत्पादने तपासणे आणि त्यांना मान्यता देणे यांची मार्गदर्शक तत्त्वे ठरवणे.
• केंद्र शासनास तांत्रिक आणि वैज्ञानिक सल्ला देणे
• आंतरराष्ट्रीय खाद्य सुरक्षेनुसार तांत्रिक मानके विकसित करणे
• खाद्य वस्तूंचा वापर, त्यातील भेसळ व उद्भवणारे धोके याबद्दल माहिती गोळा करणे
• भारतातील खाद्य सुरक्षा आणि पोषण या विषयीची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात जागृती निर्माण करणे.